राजस्व मनाचे- राम.तसेच रा:- शक्ती व म:- शिव- असणे.

 1.1 2024. राजस्व मनाचे- रा म. तसेच रा :- शक्ती। म:- शिव - असणे.

 आज २०२४ सालचा पहिला दिवस. २१दिवसांनी अयोध्येचा राम , कलियुगातील वनवास संपवून,  अयोध्यानगरीत, पुनर्स्थापित होणार. 

  माझ्या धर्मनिष्ट वाचक वृंद हो, आजपासून आपण ही रामाची, आपल्या ह्रदयात, "प्रतिस्थापना" करू या. त्यासाठी प्रथम, त्या रामाला समजून घेऊ या. मी राम ह्या शब्दाचा पुढीलप्रमाणे अर्थ लावला आहे. तो अर्थ ह्या शब्दाच्या दुसर्‍या   अर्थाला- संपत्ती अनुसरून ही आहे.

              "राम = राजस्व मनाचे."

         हे जरा आगळे वेगळे आहे. पण मला ओळखणारे व समजणारे मूळ वाचक निश्चित अंदाज करतील कि,   there is something special  in my mind. and  eagerly start reading. या वाचकांच्या दृष्टीकोनाची, मी खात्रीशीररित्या पुर्तता करीनच करीन. अन् तुम्ही या २१  दिवसात, परत परत माझ्या या ब्लॉगमध्ये याल अशी खात्री बाळगते. 

    रामनवमी नंतर बाराव्या दिवशी. तेव्हा दशरथ व कौसल्या पुत्राचे नामकरण, भव्य स्वरूपात साजरे केले असणार. तेव्हा नेमके हेच नाव का बरे, ठेवले असेल.तेव्हा या,"राम" नावाचे गुपित जाणून घेऊ या.

       राजस्व म्हणजे राज्याची आय. येणारी funding. करस्वरूपी जमा होणारी संपत्ती.  आता राम म्हणजे आपल्या मनात जमा होणारे, सुविचार ( फळ्यावरील वा  शालेय जीवनात फक्त,  वहीत लिहून रद्दीत गेलेल नव्हे, तर) जीवनात पदोपदी आचरणात आणलेले  सुविचार व संस्कार. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जूना मराठी सिनेमा," छडी लागे छमछम. एका शाळेतील शिक्षा पध्दती, नवे मुख्याध्यापक, मानस शास्त्रीय सिध्दांताद्वारा, बदल करू पाहतात. मूळात मानस शास्त्र हे, या  "राम" संकल्पनेवर आधारित आहे. "राम"  चा एक गर्भितार्थ, मी आपल्या अाधी विशद केला आहे. तो आठवत असेलच.  पण नव्या वाचकांसाठी परत सांगते,

                      श्री राम।

                      'रा'  शक्तिरिती विख्याता: ।

                       'म' शिव: परिकिर्तित: ।

                        शिवशक्त्यात्मकं   बीजं  ।

                        राम, राम  इति गीयते  ।    

             "रा' म्हणज  शक्ती आणि  ' म' म्हणजे शिव 

                   शिव शक्ती एकत्र म्हणजे शक्ति असणे 

               क्षमता. म्हणून आपण म्हणतो, रामबाण उपाय. 

      राम सत्य आहे की नाही, ही शंका काढणार्‍यांना, एक प्रश्न विचारते, जेव्हा मुलांमुलींचे, संकेत अन्वय अनिकेत वगैरे ठेवताना  अर्थाचा विचार केला असेलच नं? असो.  राजघराण्यात जन्मलेल्या प्रथम सुपुत्राचे नाव ठेवताना, त्याकाळी मातापित्याने, हा विचार करूनच हे,  "राम" हे नाव ठेवले असणार ना? तर हे दोन अर्थ मी सांगितले  आहेत. पटले तर, राम (आत्म क्षमता) वा राम ( राजस्व मनातील- सुविचारांची साठवण) हे विधान लक्षात घ्या.

        आज दोन दिवसांच्या gap नंतर एवढेच. पण खरे तर आभाळायेवढे ज्ञान. Actually, for meaning of RAM -the sky is the limit. The sky is the unending SPACE.   

       तर उद्यापासून ,प्रसिध्द,"रामरक्षा" चे अध्ययन करू या.त्यात ही जो गो गर्भितार्थ आहे, तो शोधू. तर फक्त धर्मच नव्हे, तर कर्म  ह्या कृतीसाठी,सहपरिवार, मित्रमैत्रणींसमवेत या बरे, ह्या ब्लॉगमध्ये! इथे, आजकालच्या, stylish invitation च्या अनुसार, how many persons are attending from your  परिवार अशी विचारणा नाही बरे का! माझ्याकडे ही , " ज्ञानाची दौपदीची थाळी" आहे. 

       unlimited thali आहे.  तर मग याच. वाचाच. आणि  ज्ञानामृत मिळवा.

       <> <> <><><><> <><>  <> <> <><>

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू