रामरक्षा. ३२ ते ३६ रामरक्षा संपूर्ण. पण आपल्या अर्चनेस प्रारंभ.

 १०.१ .२०२४ .रामरक्षा . ३१ ते ३६. रामरक्षा समाप्त.पण आपल्या अर्चनेचा शुभारंभ.

 वाचकहो,आज मी रामरक्षा, पूर्ण करीत आहे. पण ती फक्त ह्या ब्लॉगमध्ये. पण कृपया ही आपल्या ह्रदयात, व मोबाईलमध्ये save करून ठेवा, अशी हात जोडून 🙏 विनंती आहे. ते तुमच्या आमच्या हिताचेच आहे.   

        दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।

          पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनंदनम्‌ ॥३१॥



     ज्या श्रीरामांच्या डाव्या हाताला लक्ष्मण व उजव्या हाताला जानकी व समोर हनुमान बसले आहेत त्यांना मी नमस्कार करत आहे.

        लोकाभिरामं रनरङ्‌गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्‌ ।

      कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥३२॥

               संपूर्ण विश्वात सुंदर व   रणक्षेत्रात धैर्यवान असलेल्या, राजीवलोचन, रघुवंशातील नायक असलेल्ता करूणाकर अशा श्रीरामांना मी शरण जात आहे.


      मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।

     वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥       

                मन ज्या वेगाने सर्वदूर जाते, त्या वायुच्यासमान वेगाने, संचार करू शकणार्‍या, पण तरीही जितेंद्रिय तसेच बुध्दिमान पवनसूत वानरश्रेष्ठ अशा श्रीरामदूताला मी शरण जात आहे. ह्या मंत्राचा जपाने, हनुमान प्रसन्न होऊन भक्तावर  कृपादृष्टी करतात.


              कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।

     आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥३४॥


 मी ह्या कवन रूपी फांदीवर बसून,  "राम राम" या मधुर अक्षर मंत्राच्या अविरत उच्चाराने पावन झालेल्या वाल्मिकि मुनींना ( कोकिळेसमान) दंडवत घालीत आहे.

               आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्‌ । 

             लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥३५॥


मी या विश्वप्रिय व सौंदर्यवान भगवान श्रीरामांना पुन:पुन: नमस्कार करून,  विश्वासपूर्वक  सांगत आहे कि ते संसारातील सर्व आपदा दूर करतात, व सर्व भक्तांना सुख व संपत्ती देतात. हा एक जणू मंत्रच आहे. त्याचा जप ही आपले भाग्य खुलविते.

       ह्या कलियुगात, तेच जणू.आज भारत देशात, दहावा अवतार घैऊन अवतरले आहेत. अन् ह्या दशावतारीच, त्यांच्याच हातून, सातव्या अवतारातील, श्रीरामाच्या अयोध्या नगरी  राममंदिराचे, भूमीपूजन झाले आहे. आणि चमत्कार म्हणजे त्यांच्या शतायुषी मातोश्रीनी, याचि देहि याचि डोळा , हा सोहळा घरातून बघितला आहे. कोणाच्या नशिबी असे भाग्य आहे.

   फक्त या दहाव्या अवताराच्या नावाप्रमाणे, आपलीच मंडळी, त्यांना कलंक लावण्यात गढलेली दिसत आहेत. संत तुकारामांच्या उक्ती प्रमाणे " निंदकाचे घर असावे शेजारी"  घडत आहे. असो.  "तो राम बघतो रे" असे समर्थांनी म्हटले आहेच.  खरे सुवर्ण अग्निच्या सान्निध्यात झळाळतेच. 

     श्रीराम जय राम जय जय राम! 

       या संताच्या महा भूमीत दुदैवाने साधूंची हत्या होतेय.  प्रशासन जरी या दशावताराच्यापासून दुरावले असले,तरी सच्चे शिवभक्त, या शिवशंकराने बुध कौशिक मुनींच्या हाती, लिहिलेल्या रामरक्षेचे पठण करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू