छत्रपतिु संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ- बुधभुषण व त्यांच्याशी झालेली गद्दारी.

 छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या१६ व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ व त्यांच्याशी झालेली गद्दारी.

        देशप्रेमी व जागृत वाचक हो,  आज आपला संपूर्ण भारत देश राममय झाला असताना, आपल्या महाराष्ट्रात काय चाललेय बरे?  आज फाल्गुन जवळ आला.  छत्रपती    संभाजी महाराजांची आठवण व अभिमान आणि आपल्या मराठेशाहीचा गर्व अन् त्यांचे बलिदान आठवून, स्वबळावर, पराक्रम ( आजच्या काळातील- शिक्षण व चांगली  नोकरी. मिळवून स्वाभिमानाने जगावयाचे, तर हे भलतेच चाललेय.    

           मेधावी, मतिमान, दीनवदनो',

           दक्ष' क्षमावान,  ऋजु: ।

            धर्मात्मा,   अपि अनुसुयको,लघुकर:,

             षाङग़ुण्यविद्, शक्तिमान् ।

               उत्साही पर रंध्रविद् कृतधृति:, 

                  वृध्दिक्षयस्थान् विद् ।

                   शूरो, न व्यसनी, स्मरति उपकृतं, 

                   वृध्दापसेवी च य:।। २ ।।                            असे वर्णन लिहिणारे - विवेचन करणारे शंभुराजे स्वत:च्या. जीवनात नक्कीच  घसरणार नाहीत. अशक्य. मग का मोहित्याची मंजुळा व थोराताची कमळा असले मराठी चित्रपट काढले गेले व आमच्या व त्या आधीच्या पिढीने पाहीले. खरे तर, या कथानकांना पुरावे दस्तऐवज नाहीत. मला नेहमीच होळी पासून, फाल्गुन अमावस्येपर्यंत  बेचैनी वाटते. ह्लदयात खोलवर आर्त उठते, का? का?  हे त्यांचे हाल हाल - त्यावेळी हजर असलेले लोक, फक्त  बघ्यासारखे  निशब्द  बघत राहिले? का त्यांचे रक्त उसळले नाही?  आता जर तर ला अर्थ नाही. पण जर उपस्थित जे जे मराठे होते. ते एक झाले असते तर आज आपली सद्यस्थिती कशी असती हो! शिर्केंनी निदान अापल्या, भगिनी येसूचे कुंकु, वतनापेक्षा महत्वाचे मानले असते. त्यांची --स्वराज्याची प्रबळ निष्ठा प्रखर ठरली असती तर? निदान आपल्या धर्मपत्नी राजकुँवरच्या ( छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी व छत्रपती  संभाजी महाराजांची थोरली बहीण) मनाचा विचार केला असता तर? 

   खरेच इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मुलीच्या मूक दु:खाचा आपल्या सर्वांना का बरे विसर पडला?

   आज हा प्रसंग समोर आणत आहे, कारण आजचे , सर्व मराठे, शिवशाहीचे वंशज, एका व्यक्तीच्या सांगण्यावरून, rather,  चिथवण्यामुळे, एकत्र मोर्चे काढत आहेत. मग हे भोसल्यांचे अभिमानी कि, शिर्कें यांचे पाठीराखे???. 

    खरे तर, नोकर्‍यांचा विचार केला, तर देशातील समस्त नोकर्‍यात, आरक्षणात फक्त सरकारी नोकर्‍या बसतात. म्हणजे, साधारणतः उपलब्ध असलेल्यापैकी, फक्त २० ते २३% च. हां, शिक्षणात मार्कांच्या बाबत, सवलत मिळते. पण ६०.७०% मराठे धनसंपन्न आहेत. हा आलेख पहाता आरक्षण फक्त आर्थिक  स्तरावर अवलंबून असावे. मुख्यतः जी मुले, अनाथालयात वाढत आहेत.त्यांना स्वातंत्रांनंतर ७० वर्षे कोण वाली होते. त्यांचा विचार, आता २ वर्षात, आरक्षणात केला आहे. कोणी ते सांगणे न लगे! 

    एवढेच वाटते कि, मराठेशाहीचा अभिमान असेल, तर स्वबळावर व स्वाभिमानाने, ध्येय गाठले, तर त्या छत्रपतींना आपल्या मावळ्यांच्या वंशजांचा  अभिमान वाटेल.  पण आज त्या मोर्चात, सिने नट वापरत असलेल्या, व्हनिटीचा dairy 20 ते २४ हजार खर्च कसा केला जात असेल? विचार करा. या सर्वांच्या मागील शक्ती कोण असेल? विचार करा हो, माझ्या वाचक हो, मला काय त्याचे? म्हणून  भागणार नाही. उद्या पूर्वीच्या काही अनुभवांचे कथन करणार अाहे. देशप्रेमी व्हा. स्तब्ध राहणे, हा ही चुकीचा व्यवहार असतो बरे! तर काय करायचे तुम्हीच ठरवा. माझे काम 🔜✅🔯 मी करतेय. ह्या चिन्हांचा अर्थ मनःपूर्वक व धर्मःपूर्वक लावालच.  मी काय सांगू? हो, त्या श्लोकाचा अर्थ उद्या सांगते.ॐ श्रीराम! 

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू