आपले ग्रंथ महत्वाचे आहेतच.पण कळावयास कठीण, असे मानले जातात. पण ते अगदी सोपे आहेत
२९.१ .२०२४.आपले ग्रंथ महत्वाचे आहेतच. पण ते जरा कळायला कठीण, असे मानले जाते. पण ते अगदी सोपे आहेत.
माझ्या सुजाण वाचक हो, सर्वसाधारण, असा समज आहे कि, ग्रंथ म्हणजे, बाप रे! कोण त्यात डोेके घालणार? ठीक आहे. मग मनोरंजक असे, युट्युब वरील वेचक प्रोग्रॅम बघा. जे crime patrol मधील काही episide मनोरंजनासोबत काही शिकवण व सावधगिरी सांगत असतात. त्यांची सुरुवातच बघा. त्यात crime patrol या शब्दाबरोबर, सतर्क सावधान व दस्तक हे जोडशब्द वापरले जातात. त्याचा अर्थ काय? "दस्तक" म्हणजे, दारावरील ठक ठक. या शब्दाचा दुसरा, शिवकालीन प्रचलित अर्थ आहे, परवाना मिळवण्यासाठी दिलेली, "फी वा कर" म्हणजे, एक प्रकारचा जकात कर. तो टाळणे, म्हणजे अपराध. आता दुसरा शब्द "सावधान" ह्याचा अर्थ सरळ आहे. स+ अवधान= अवधानसह= कोठचीही action वा reaction करावयाची ती आधी पूर्ण विचारांतीच करावी. तिसरा शब्द , " सतर्क" तर्क म्हणजे एखादी घटना कशी घडेल,त्याचा परिणाम काय होऊ शकेल, त्याबद्दल अंदाज करणे. स+ तर्क. तो अंदाज ही positive असावा. त्या episodes च्या सुरूवातीस अँकर, जे बोलतो, फक्त तेच जरी ऐकले, तरी हे धकाधकीचे, जीवन सुकर होईल, बघा. जर ऐकून, त्यावर विचार व चिंतन कराल, तर बघा किती ज्ञानार्जन होईल.
आज येवढेच. पण समाधानी व सौख्य पूर्ण जीवन मिळवाल. व इतरांना बघायला सांगून, ते दाखवत असलेल्या घटना बाबत चर्चा करा. अन् तो संदर्भ घेऊन, मी या ब्लॉगमध्ये, संत वाङमयाद्वारा व सूचना देऊन, जे काही सांगायचा प्रयास करतेय, ते पटेल व प्रयासाचे रूपांतर, प्रयत्नात होईल अन् तोच तर माझा उपदेश आहे हो.आजचा लेख लहान पण विचार महान.
😉😊😉😊😉😊😍😊😊😉😊
ही सरस्वती देवी आहे वॉशिंग्टन मध्ये. अमेरिकेत! तिच्या पायाशी बसून ३ विद्यार्थी अभ्यास करत आहेत. सरस्वतीच्या पायाशी बसलेला एक मुलगा आहे - बराक ओबामा. वंशाने आफ्रिकन, कर्माने अमेरिकेचे अध्यक्ष, धर्माने ख्रिश्चन.
लहानपणी इंडोनेशिया मधील शाळेत शिकलेला हा मुलगा अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर, इंडोनेशियाने ही सरस्वतीची मूर्ती त्यांना भेट दिली. एका मुस्लिम धर्मीय देशाच्या सरकारने, ख्रिश्चन धर्मीय देशाच्या अध्यक्षांना दिलेले सन्मानचिन्ह!
'सुसंस्कृत' पणा म्हणतात तो हा. जे सुसंस्कृत असतात त्यांना विद्येचे, विद्येच्या देवतेचे महत्व. विद्येच्या देवतेची पूजा करायला - धर्म, देश, वंश, पदवी आड येत नाहीत.
वा क्या बात है। आणि आपले बौध्द म्हणवणारे, म्हणतात, आम्हाला , सरस्वती माहित नाही. आमची( म्हणे)सावित्रीच खरी. तिला पण जेव्हा सरस्वती प्रसन्न झाली, तेव्हाच ती, कोणितरी बनली.

Comments
Post a Comment