सभ्यता व संस्कार कोठे मिळतेय का बाजारी?सुसंस्कार ही पालकांची जबाबदारी, होय.
२९ .२ .२०२४ . सभ्यता कोठे मिळतेय का बाजारी? सुसंस्कार ही पालकांचीच जबाबदारी. होय.
व
माझ्या सुसंस्कारी व समंजस वाचक हो,
माझ्या लिखाणाला- माझ्या सामाजिक हाकेला, मनपूर्वक, प्रतिसाद देत आहात. मी आज फार पूर्वीचा लेख (२१.९ .२१ चा लेख पुनर्प्रसारीत करीत आहे. मी काही बाबतीत, आदिवासींच्या श्रध्देचा, अनेक वेळा आदरयुक्त उल्लेख केला होता, आठवतोय. इथे शहरवासीय, स्वतःला सामाजिक रित्या सुशिक्षित मानतात. अन् या डहाणूच्या आदिवासींना अडाणी. अर्थात् मदतीचा हात पुढे करतात. आम्ही पूर्वी व.क.आ. च्या माध्यमातून, तेथे जात असू. मोजकेच खरे कार्यकर्ते. पण दिवाळीला खूप लोक येत खाऊ वाटपासाठी. तुम्हाला ऐकून माहित असेल,आदिवासी महिला फक्त साडी नेसतात. चोळी- पोलके नसते. तर त्यावेळी आमच्यापैकी एका महिलेने, त्यांच्यातील,बाळाला अंगावर पाजत बसलेल्या आदिवासी बाईंला, याबाबत सल्ला दिला, त्या बोलल्या, " अग, पुरूष माणसे वाईट नजरेने बघतात." ती जरा नवलाने बघू लागली. अन् त्यांच्यातील, जवळच बसलेले, वयस्क गृहस्थ काय म्हणाले माहीतेय? म्हणे, " कायच्या काय बोलतावं, ते तर आईचे देणे, त्याकडे कोण वंगाळ नजर घालील, समदे मायचे दूध पिऊनच,वडले झाले नव्हं?" आता सांगा, सुसंस्कृत कोण? शहरातील तसले अनुभव देणारे महाभाग कि, ते पाड्यावरील भाबडे आदिवासी?
स्वातंत्र्यापासून, आपल्या शाळेतून विद्यार्थ्यांना,धार्मिक शिक्षण देण्यास बंदी घातली. अन् ती आजतागायत. पण नीट वाचन व मनन व त्यावर चिंतन केले, तर एक सत्य दिसून येते, कि आपल्या संतांनी जे जे लिखाण केले, त्यातून निती, सदाचार, सत्कर्म आणि सत्शील या बाबत, उपदेश केला आहे. हे सर्व जर वेळेवर, शिकवले असते, तर अर्धे तरी अपराध - गुन्हे दुराचार कमी झालाच असता. चांगले संस्कार होणे,सहजी घडले असते. निदान वाचक हो, ही धुरा हातात घ्या व जमेल तसे, जमेल, त्यांच्यावर ही कृपादृष्टी टाका. वेळेचा सदुपयोग करा. त्यासाठी face book &whatsup वर हा लेख share करा
Comments
Post a Comment