हिंदुत्व व आपण सामान्य, जे जीवन जगत आहात, ते कसे आहे,हे जाणून घ्या. आपल्यामागे स्मृति गंध ठेवा. पैसा आनी जानी है।

 १७. २ .२०२४ .

        हिंदुत्व व आपण सामान्य, जे जीवन जगत आहात, ते कसे आहे, हे जाणून घ्या.आपल्या मागे स्मृति गंध  ठेवा. पैसा आनी जानी  है।

         माझ्या हिंदुत्व अभिमानी बंधु भगिनींनो, काल मी लिहिले होते, मी एक कविता सांगेन. अहो, आपण सर्व, ह्याच कवितेतील, नायकाप्रमाणेच, " हुबेहूब जगत आहोत. हे सत्य आहे, पण कोणास वळत नाही. हे वाचल्यावर नाराज होण्यापेक्षा, जीवनवृत्तीत बदल घडवा.

          ही  इंग्लिश कविता आठवा. आमच्या पिढीने तिचा ८ व्या इयत्तेत अभ्यास केला. प्रश्न- उत्तरे लिहिली.

        soloman grandy


                   Solomon Grundy,

                  Born on a Monday,

                   Christened on Tuesday,

                  Married on Wednesday,

                     Took ill on Thursday,

                   Grew worse on Friday,

                         Died on Saturday,

                   Buried on Sunday,

                        That was the end,

                    Of Solomon Grundy.


    ह्याचा अर्थ जन्मला, सामान्य जीवन जगला. फक्त आपल्या पुरताच जगला. ना इतर कोणासाठी काही केले अन् कोणाच्या स्मरणात राहिला. त्याच्यांत दफन करतात, म्हणून,थडग्यावर नाव नोंदवले गेले. पण ते ही कालांतराने पुसले जाणार.

          म्हणजेच विशिष्ट शिक्षण ( मग ते कसेबसे वा उच्चशिक्षण) नोकरी -छोकरी+( I mean)  लग्न- मुले- विमा- अन् मग निवृत्ती, अन् यानंतर आठवते. दासबोध वगैरे वाचन. 😁 या चक्रात जीवन जगणे. यात कोठेही सामजिक जबाबदारी बसतच नाही. हेच सोलोमन ग्रंडीचे आयुष्य. मागे काही शिल्लक नाही. निदान आजूबाजूच्या गरजू मुलांना, आपला समय द्या हो. अगदीच नाय तरी, घरच्या कामवालीच्या मुलांची गरज भागवा. बहुदा तिचा नवरा, " पिक्कड" असेल, त्याला मार्गी लावा. हे काम दोघे पती-पत्नी मिळून करू शकाल. फक्त मला काय करायचेय, ही वृत्ती सोडा. इच्छा पाहिजे. मग मार्ग मिळतोच. नाहीतर जीवन व्यर्थ होय. SOLOMAN GRANDY सारखे, जन्म मरणामधील काळ  या दुनियेत राहणे, बस.  या कवितेचा अर्थ- किती वर्षे  जगलात तरी जणू,  एक week चेच अस्थित्व असणार. बघा. आपले एक गीत सुध्दा हेच तत्व सांगते.

          जन पळ भर म्हणतील हाय! हाय।  जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' मी जातां राहील कार्य काय।।


सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। होईल कांहिं का अंतराय।।


मेघ वर्षतील शेतें पिकतील। गर्वानें या नद्या वाहतील।। कुणा काळजी कीं न उमटतील। पुन्हा तटावर हेच पाय।।


सगे सोयरे डोळे पुसतील। पुन्हा आपल्या कामी लागतील।। उठतील बसतील हसुनि खिदळतील। मी जातां त्यांचें काय जाय।।

      जर तुम्ही काही कार्य केलेत, तरच तुमची प्रतिमा, अमर राहील. बघा. हे माझे बोल, फक्त वाचून सोडू नका.Do something.👍✌.

~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू