गुन्हाची विषवल्ली आज विराट व उग्र स्वरूप धारण करतेय.

 २८.२ २०२४.   गुन्हाची विषवल्ली आज विराट व उग्र स्वरूप धारण करतेय. 

       मम सतर्क व सजग वाचक हो, काल मी लिहिले होते. केसाचा गुंताडा आपणच करतो.  ही जी गुन्हाची विषवल्ली फोफावतेय. पण का व कशी बरे? आपली जनताच तिला खतपाणी घालतेय.  सर्व  जेष्ठ नागरिक retirement, नंतर मिळालेल्या धनाची, हव्यासापोटी डब्बल तिब्बल करण्यासाठी investment &share च्या मागे लागतात.  त्यासाठी online सल्ले मागतात. अरे बाबांनो, retire होण्या आधी ४.५ वर्षे या investment & shareability चा अभ्यास स्वतः करा.आपल्या मुलांची, काही स्वप्ने  वा योजना असतील , तर त्यात स्वतः ही भागीदार बनून, invest करा. धनासोबत तन मन ही लावा. उगीच time killing चा सवाल ही पैदा होणार नाही. आता बघा. ही बातमी- स्वतः व्यावसायिक असलेला फिर्यादी. त्याला म्हणे, share maket trading आमिष दाखवून तीन कोटी ७०लाखाला लुबाडले. हे म्हणजे, त्या victim चे , "आ बैल मुझे मार, सारखी गत आहे. अरे,  एवढ्या मोठ्ठ्या रकमेने, जो आपला व्यवसाय आहे, तो वाढवायचा नं?    एक सांगू, सकल नोकरदारांचे स्वप्न बघून ठेवलेय, निवृतीनंतर, भरघोस पैसा हाती आला कि, धावले परदेशवारी करण्यास. मग धन्य धन्य वाटते की त्यांना. जरा या travel agencies च्या पेपरातील जाहिरातीत बघा. एक माणूस दिड- दोन लाख. दोघे म्हाताररमा- म्हातारी ( का हसताय) मिळून, तीन साडे तीन लाख दहा दिवसात गडप.  ते बेस खोर्‍याने कमवत आहेत तुमच्या जीवनभराच्या कमाईतून किंवा वर सांगतल्याप्रमाणे, लगेच डिमॅट खाते उघडून, online सल्ले विचारत सुटतील.अन् कधी न पाहिलेल्या,सल्लागाराच्या भरवशावर, आपली धनाची थेली सैल करतात. बरे जरा शे- पाचशे च्या बाबतीत, आपल्या बाळ्यावर विश्वास न ठेवणारी मंडळी, "असल्या आमिषाला" बळी पडतात. मासा कसा गळाला लागू शकेल, ते या गुन्हेगारांना बरोबर माहीत असते.  मग ह्यात दोन्ही बाजूचे लोक, तितकीच जबाबदार असतात, हे पटतेय नं!  समस्त संत मंडळी हेच सांगतात. निदान ४०.५० या वयात दासबोध वाचा, अन् अक्कल आपलीशी करून असल्या चॅप्टर लोकांपासून वाचा. आपली, " वाचा" वापरा व चार लोकांशी बोलून , हे ज्ञान मिळवा. वाचन करा.  पेपरमधील बातम्या वाचा. बघा, हा, " वाचा" शब्द वेगवेगळ्या, उच्चारातून, अनेक तर्‍हा दाखवतो.  महिलांनो, त्या फालतू परिवारातील भांडणाच्या मालिकात डोके खुपसू नका, अन् पुरूषांनो, सारखे त्याच त्याच मॅचेस बघून, घराला, मॅचेसची काडी लागे, तोवर कुंभकर्ण होऊ नका. कुंभासारखे कान ज्याचे तो. 😉😊 .असे आहे, कुंभाला तळ असतो. जो खालून बंद असतो. तसेच जर, जे ऐकले, तर त्या बंद  कुंभा-माठाप्रमाणे, मेंदूत शिरत नसेल. तर~~~ असो.  बघा. ही आजच्या ,संध्याकाळमधील बातमी. खाली फोटो देत आहे.  नेत्राच्या द्वारे, मेंदूत पोहचवा. सावध व्हा व share करा व चर्चा करा.  दुसरी अशीच बातमी आहे. 

 खाली बघा.+ चे -  होतेय😖😖🤔.





Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू