नाव:-नेकी कर दर्या.में डाल। कोणीतरी आपले FOOT PRINTS FOLLOW करतीलच.

 ७.२ . २०२४. नेकी कर और दर्यामें डाल। दिलासा दिलात

  अाता विसरा..

 माझ्या सुस्वभावी वाचक मित्र मैत्रिणीनो,  मी दोन दिवसापूर्वी "मैत्र" या शब्दावर भाष्य, सरळ शब्दात मत सांगितले होते. तसेच "स्वभाव" ही  कसा समजून घ्यावा, या बाबत, सूचना केल्या होत्या. आता आपण करीत असलेल्या,  चांगल्या कर्माबाबत विचार करू. काल मी जी घटना सांगितली. त्या बाबत, एक अनाहूत सूचना, जी मला मिळाली , " अहो, तुम्ही इतकी फोनाफोनी केलीत, जर समोरच्यांनी, दुर्लक्ष केले असते तर, किंवा तुम्हाला काय करायचेय? असा सवाल पुढे आला असता, तरऽ ऽ ऽ

    त्या पालकांना,तुम्ही केलेला,  ""  उद्योग"" कळला तरी का? काय म्हणायचे - ह्या कर्माला. प्रत्येक वेळी काही छोटेसे काम केले तर लगेच CREDIT मिळवायला, आपण काय राजकारणी आहोत का?

     आपण अाहोत, एकमेकांसाठी , " समाजकारणी - give & take policy. बस. 

    आता या बाबतीतील, एक मजेशीर घटना सांगते. ही गंमत घडली, साधारणतः २० वर्षापूर्वी.   मुंबईच्या ट्रेन मधील मरणाची गर्दी, तुम्हा सर्वांनी, अनुभवली असेलच. ती वेळ, संध्याकाळची-  ऑफिस सुटण्याची. दिवसभर थकून गाडीत उभ्याने प्रवास -अर्ध्या एक तासाचा. महिलांचा डब्बा. अन् घरी पोहोचल्यावर, चप्पल काढल्या पासून, कामाची लांबलचक व रांग. अशात, त्या गर्दीत, दादरला, ३.४ बायका चढल्या. कोठच्यातरी समारंभाहून परत येत असाव्यात. खुशीच्या मूडमध्ये. माझ्या बाजूस, जी एक बाई होती, तिला उभ्या उभ्या झोप लागली होती. दमतात हो. office ladies. त्या साळकायांचे लक्ष तेथे गेले, अन् काय सांगायचे, एकमेकींना दाखवत हसू लागल्या. एक उवाच, "काय तरी बाई, ही बाई उभ्याच झोपलीय बघा"  दुसर्‍या बाईचे भाष्य, " आम्हाला तर बिछान्यावर पडल्यावर ही चटकन झोप लागत नाही", अन् त्या चौघी फिदीफिदी हसू लागल्या. अन् माझे टाळके सटकले.

     मी त्यांना  झापले,"तुमच्या खांद्यावर तर डोके नाही नं ठेवले, अं? असे दररोज दिवस रात्र मेहनत करा.  मग कळेल. माझे पाहून दुसरी पण म्हणाली, नायतर काय, लोकांना वाटते, आम्ही चांगल्या साड्या नेसून मिरवतो.पण~~    लांबून कोणीतरी उद् गारली, "असे आहे, घी देखा पर बडगा नही देखा। घरी गेल्यावर सैपाक वगैरे शिवाय मुलांचे अभ्यास.  सगळ्यांचीच तोंडे चालू झाली. नंतरच खरी गंमत झाली. त्या बायकांना ही आपली चूक समजली. त्या एकदम ,सॉरी हं, हे लक्षातच आले नाही,म्हणाल्या थोडा वेळ थांबून त्यातील वयस्क महिला म्हणाली, आता हे लक्षात ठेवीन. माझी सून ही अशीच दमून येत असेल नं! बघा, आपसूक एक सत्कार्य घडले ना, माझ्या भोचकपणामुळे. सर्वांत मजेशीर बाब म्हणजे, या घटनेची, "नायिका" निद्रा सुखातच मग्न होती.😊. 

     म्हणून आपले पूर्वज, म्हणींतून खरे ज्ञान देतात.´ नेकी कर और दर्यामें डाल। हम चले अपनी चाल। 

     ना फलेषू कदाचनम्।  Somebody may follow your foot prints.  निदान , त्या वयस्क महिलेच्या सुनेला बहुदा या प्रकरणाचा फायदा झाला असावा. Hope so. तर वाचक हो, असा भोचकपणा करणार ना? 

       अन् आपल्या सगे सोयर्‍यांकडून ही करवा. 

       त्या करवा चौथच्या पेक्षा जास्त पुण्य कमवा.

       👍👍👍👍👍👍👍

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू