Posts

Showing posts from May, 2025

THE SUNITA KARNIK`s SHOW EP8 - SEASON 2

Image
 

नऊ वेळा नमस्कार करतेय. आपल्या हिंदुत्वात, " नऊ " संख्येला, फार महत्व आहे बरे का,

 प्रिय वाचक हो, खरे तर मी या लेखाने सुरुवात करणार होते, पण विचार केला, जरा वाचकांना, मी हजर झालेय, हे कळू देत, मग समर्थ रामदास स्वामी, काय सांगतात, ते लिहू.  आता स्वामी, चाणक्य व कबीर, मुख्य म्हणजे आपले छ. शम्भू राजें यांचे सांगणे, समजून घेवूया.पण मजेशीर रीतीने हं.           आज, "छावा" ने  त्या, "धर्मवीराचे व कवी कलश यांचे बलिदान, पुढच्या पिढी पर्यंत पोहोचले आहे.       श्री समर्थरामदास्वामी यांना वंदन करून, मी हे लिखाण सुरू करीत आहे. लेखन कलेचा प्रारंभ कोणी व कसा केला, हे नंतर समजून घेऊ या. आज प्रथम ते कसे करावे, या बाबत उपदेश देणारे समर्थ रामदास हे पहिलेच संत असावेत. या त्यांच्या, या बाबतचा ग्रंथ, " दासबोध"  या विषयी माहिती देण्याचा, हा माझा खारीचा प्रयास आहे. तो जाणून व आचरणात आणून, त्याचे रूपांतर प्रयत्नात करावे, ही विनंती.        खरे तर हा ग्रंथ, शिक्षणाच्या सुरवातीलाच, अभ्यासणे, गरजेचे आहे. आपण आज समाजात, ह्या दासबोधाचा उल्लेख, " ग्रंथ" असा करतो.  त्यामुळे, हे काहीतरी, आध्यात्मिक व धार्मिक वगै...

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

 21.may 2025.        प्रिय व सुजाण, मुख्य म्हणजे सजग वाचक हो, काल एका छोट्या व अशिक्षित मुलाची, त्याच्या कुवती नुसार, आभार प्रदर्शनाची, रीत सांगितली. आज एका मुक्या जीवाची, एकनिष्ठ वर्तणूक वाचा. खरे तर आपण माणसाच्या, वाईट वागण्याचा उल्लेख, "पाशवी" असा सहजच करतो. पण पशू किती संवेदनशील असतात. त्याची सत्य कथा वाचा. केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.        हो. हे एक अजब असा अनुभव मनाला व जीवाला चटका देऊन गेला. आठवणीने ही मन भारावून जाते.         झाले असे की, माझ्या.मुलांना कुत्रा पाळावयाचा होता. पण माहिमच्या दोन खोल्यांच्या जागेत , ते अशक्य होते. एक तर मीच परिस्थितिमुळे, माझ्या दोघा मुलांसह( प्रशांत व राहूल) आई-दादांकडे(वडील)  राहत होते. मुलांना त्याची जाणिव होती.मला भांडूपला क्वार्टर मिळाल्यावर, आम्ही आईदादांसह तेथे shift झालो. चार खोल्यांची प्रशस्त जागा अन् ती ही तळमजल्यावर, तेव्हा कुत्रा पाळायचा हे नक्की केले. एक तर मुलांची हौस व दुपारी आम्ही तिघे बाहेर पडल्यावर आजी दादांना सोबत.          ...

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

 माझ्या सुजाण वाचक हो,मी आपले स्वागत करत आहे. व आभार ही मानत आहे. तसे तर कित्येक दा कोणा ना कोणाचे आभार मानतो. कधी कधी इतर जण आपले आभार मानतात. त्याच वेळी काही gift ही देतो वा स्वीकारतो. पण आज इतक्या दिवसाने, मी आपल्याला भेटत आहे. तेव्हा एका अनोख्या आभार प्रदर्शनाची कथा सांगणार आहे. यात मला, एक अनोखा व अनमोल नजराणा मिळाला, एका छोट्या अनामिक मुलाकडून. तर वाचाच, ती हकीकत. कृतज्ञता. एक अनोखा अनुभव      ही एक सत्य कथा आहे. आपण, आभार मानतो, तेव्हा ती बहुदा शाब्दिक असते. कधी कधी return gift च्या स्वरूपात असते. या बाबतीतला ना शाब्दिक ना भेट स्वरूप असा एक नजराणा, मला मिळालाय. नुसत्या आठवणीने, मन भरून व भारून जाते हो.  हाच  माझा एक अनुभव, मी तुम्हाला सांगणार आहे. अापण दुसर्‍यासाठी थोडे केले, तर देवाच्या दारी नक्कीच रूजू होते.        ही घटना आहे   १९९७ ची.  अशी ही एक, दिलसे, कृतज्ञता. आम्ही मालाडला रहात होतो. माझे वडिल अचानक आजारी पडले.  पण CGHS ची  सोय अ  ‍ सल्याने त्यांनी प्रायव्हेट मध्ये जाणे, नाकारले. तेव्हा त्यां...

परत स्वागत आहे...

 माझ्या प्रिय व सुजाण वाचक हो, खरे तर मी तुम्हाला व तुम्ही मला, ओळखताच, फक्त मध्यन्तरी, मीच, गुगलपासून दूर झाले होते. विचार केला, की, पुस्तक स्वरूपात तुम्हाला भेटावे. चार पुस्तके झाली ही. पण या भेटीची मज्जा, त्यात नाही हो. तेव्हा कसे, फोन करून तुमच्यातील काहीजण संपर्कात होती. असो एक प्रकारे, back to sweet home. तर आता दररोज current topics वर लिहिणार आहे तर आधीचे वाचक चला या बरे. तसेच नवनवे ही मित्रमंडळ जमा करू या. लवकरच हा ब्लॉग व्हॉग होईल. नवेनवे स्थळी जाऊ. आणि हो, हा लवकरच audio ही असेल.. तर सुरू.      हरी ॐ, शुभस्य शीघ्रम  प्रत्येक व्यक्तीच्या मनात झंझावाती विचार येत असतात. पण त्याकडे बहुतेक जण दुर्लक्ष करून, इतर बाबीत मन गुंतवतात. पण ते विचारच, नवनिर्माण करू शकतात. म्हणून त्या विचाराचे रूपांतर, आचारात आणणे, निकडीचे आहे हो.