कायल म्हणजे प्रभावित होणे.

 माझ्या सुजाण वाचक हो  आज मी फार पूर्वी लिहिलेला लेख,  काही आठवणी जागृत करण्यासाठी, परत तुमच्या समोर आणत आहे. वाचून अगदी खरे सांगा, या ऑपेरेशन, "सिंदूर वरून तुम्हीही, "नमो " च्या बाबतीत, "कायल "झालात नं.  ॐ नमो नमाय |

कायर व कायल.

माझ्या अादर्श नागरिक वाचक मित्रमैत्रिणीनो, हो,तुम्ही कितीही वयाचे असाल, पण माझ्या मताशी सहमत आहात, म्हणून , माझ्या हा ब्लॉगमधील लिखाण वाचत आहात. खरे तर काही अप विचारापासून, आपण दूर आहोत, मग आपल्यात मैत्रtच आहे ना!  

    आता हे बघा-  कायर व  कायल हे दोन्ही हिंदी शब्द. 

         उच्चारात जबरदस्त साम्य अ‍ाहे.  पण अर्थात  मात्र अगदी विरोधाभास आहे.

  तसे पाहिले तर कायर negetive भित्रेपणा. म्हणजे एखादी गोष्टीला घाबरणे. त्या परिस्थितीला तोंड देऊ शकणार नाही, असे जाणवणे व मानणे. ह्या शब्दाशी सर्वच लहान मोठे परिचित आहोत. 

      पण मध्यंतरी बातम्यातून , " कायल" हा नवीन शब्द ऐकला. बहुतेक लोकांना माहित नसावा. मलाही त्याचा अर्थ कळला नाही. 

       बातमी अशी कि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. ट्रँप " हमारे भारतीय जीवनशैली" के कायल हुये।  मला हा शब्द नवखा वाटला. कोणी काही म्हणा, पण मी मोबाईलला कधीच चेष्टेतही नावे ठेवणार नाही. किती सोयी झाल्यात त्याच्यामुळे. लगेच गुगल उघडले. कायलचा अर्थ मराठी व इंग्लीश मध्ये विचारला. उत्तर एका सेंकदात मिळाले.

       कायल :- मान्यता देणे.  to convince 

      आधी वाटले, काही उलट तर नाही नं. आता बघा ती परकी व्यक्ती,  ही आपल्या जीवनशैलीने प्रभावित झाली. 

        वाचकहो, हे विषयांतर नाही. तर अगदी विषयाला धरून लिहिलेय. आपण स्वतः "कायल" आहोत कि,

   " कायर" हा सवाल, आजवर जसे जीवन जगलो, त्यावरून, स्वतःला विचारा. मला माहित आहे, हे वाचल्यावर, सर्वजण नाराज होणार. कदाचित पुढे वाचणे, सोडून द्याल.पण ह्या प्रश्नाचा जबाब काय मिळाला, त्यावरून "स्व" भाव समजून घ्या. अन् आपल्यालाच, "जाब" विचारा,आजवर मी किती परक्या व्यक्तींना,  संकटात मदत केली आहे. अन् किती परक्या व्यक्तींनी, आपल्याला, अडचणींच्या समयी,  सहाय्य केले

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू