आपली सुरक्षा आपल्या हाती.
वाचक वृंद हो. मी तुम्हाला, सदैव सजग व जागृत, असे संबोधते. कारण इतर प्रवास वर्णने जोक्स prank, इथे असताना, आपण माझे थोडे गंभीर व उपदेशपर ब्लॉग्सचे, नियमित वाचक आहात, त्यासाठी, आपल्या सर्वांचे कौतुक करावे, तितके थोडेच.
तर काल मी लिहिल्याप्रमाणे सजग व मनी कुतूहल ठेवून जगाला सामोरे जाल, तर तुम्ही नक्कीच soloman होणार नाहीत. अहो, आपल्या आजूबाजूला कित्येक अपराधाची सुरुवात होत असते. पण कधी कधी,,त्या क्षुल्लक गोष्टी म्हणून त्या कडे दुर्लक्ष केले जाते. पण तीच सुरूवात असते. तेव्हा सरळ त्याकडे लक्ष पुरवा. कट्ट्या वर, जेव्हा काही वयस्क मंडळी बसतात. तेव्हा ते एकटे नसतात. समोर कित्येक टवाळ, नसते उद्योग करताना दिसतात. पण हयांची,आपली आम्हांला काय करायचेय, ही वृत्ती. तेव्हा खूप काही करू शकाल हो.
काय ते तुम्हीच ठरवू शकाल. टिपरे मालिकेत कित्येकदा, हे दाखवून दिलेय.ती सिरीयल पाहिली, पण.....असो.
आता बघा, कित्येक वयस्क, बँकेत एकटेच जातात. तेही चूक आणि घरची तरुण मंडळी, या साठी, त्यांना वेळ देत नाहीत, तेही चूक. तेव्हा आपले आपणच स्वतः जपायचे असते.
आता बघा काही बुजुर्ग मंडळी, तीर्थ यात्रेच्या बाबतीत, अट्टाहास करतात. आणि तरुण लोक वेळ वाचवण्यासाठी, रात्रीचा प्रवास prefer करतात.
अगदी रामायण हेच सांगते. विश्वास नाही, तर वाचा, पुढील कथा.
मी, रामायणातील प्रारंभ, सांगणार आहे. श्रावण बाळाची कथा. तो आईवडिलांना, कावडीत बसवून, तीर्थ यात्रेला निघाला होता. दोघे ही अंध होते.रात्रीच्यावेळी, दाट रानातून जात होते, त्यांना दोघांना, म्हणे तहान लागली. श्रावण बाळ, त्यांना, ठेवून, नदी वर पाणी आणायला गेला. पाण्यात बुडबुड आवाज ऐकून त्याच रात्री (हं) दशरथ राजा शिकारीला आला होता, आपल्या लक्ष वेधी, बळावर, जनावर समजून,काळोखात बाण सोडला. रात्री कोणी माणूस असेल, ते राजाला काय कल्पना. नेमका, या श्रावण बाळाला, लागून तो मरण पावला. आणि त्या वृद्ध माता-पित्याने, राजाला शाप दिला, तो ही पुत्र शोकाने मरेल, जणू त्यांची, दोघांची काहीच चूक नव्हती. आणि रामायण घडले म्हणे. असो.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मी हे रामायण, आता इथे का सांगतेय. तर माझे म्हणणे, इतके की, प्रत्येक वेळी, दुसऱ्याला वा नशिबाला, दोष न देता आपली काय चूक होतेय, त्याचा शोध घ्या.
आता एक गंमत सांगते.
मी लहानपणी(वय 12), आजी सोबत, मंदिरात, प्रवचनास जात असे, तेव्हा मी तेथे प्रश्न विचारला होता. रात्री रानातून प्रवास का केला व तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी, त्याला काळोखात पाणी आणण्यासाठी का पाठवले? त्यांना, त्याची काळजी नाही वाटली का?आजकाल, जर कोणी, प्रवासात असे केले,ट्रेन मधूनच पाणी आणायला, उतरवले, तर ती क्रूरता ठरेल. दशरथराजाची काय चुकी. रात्री पशूच, पाण्यावर येणार नं? अर्थात, मी या शंकेसाठी ओरडा खाल्ला. तसेच झाशीच्या राणीने लढाईत, बाळाला पाठीवर का बांधले, त्याला लागले असते तर ही माझी दुसरी शंका.. माझ्या मते, त्या बाळाला, त्या झाशीच्या राणीने, घरी, आज्जी कडे ठेवायचे होते नं!
तर आजच्या जमान्यात, नेहमी, सारासार विचार करूनच, प्रवास करा. मुलांना सुरक्षित ठेवा.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment