Henry Sheriyar:- papillon.

  पॅपिलॉन - लेखक:- henry sheriyar.

            सजग वाचक हो, मी काल, मुद्दाम लेख लिहिला नाही. माझी इच्छा होती की, जास्तीतजास्त लोकांनी आधीचा लेख व दोन्ही short films समजून व उमजून घ्याव्यात. And be ative असो.     

        आता पॅपीलॉन, या पुस्तकासंबंधी सांगते. खरे तर हा henry sheriyar कोणी विद्वान साहित्यिक नाही, तर एक drop out  मुलगा होता. पण हे पुस्तक त्याने स्वतः च्या अनुभवावर लिहिलेय. ते ही लहानसे नाहीतर, जवळ जवळ 600 पानी आहे. गंमत म्हणजे या मूळ जर्मन पुस्तकाचे, जगभरात 17 भाषेत, रूपांतर झालेय.

खरे तर हे पुस्तक, स्वतः खरेदी करून जवळ ठेवायला व अक्षरश:, त्याचे पारायण करावे. जेव्हा तुम्ही संकटात निराश व्हाल, तेव्हा हे पुस्तक,तुमची हिंमत वाढविल, बघा.

      या लेखना मुळे, लेखक ही पात्रता त्याला मिळालीच. पण या सोबत, त्याच्या "सातवी लाट " या शोधा मुळे, त्याची, शास्त्र विषयी ही मान्यता प्राप्त झालीय.

     त्याचा शोध म्हणजे "' समुद्राची, प्रत्येक लाट मोजली, तर जी लाट सर्वात मोठी असते. त्यापासून प्रत्येक सातवी लाट जोरदार असते. जशी ती जमिनीवर जोरात धडकते, त्याच जोराने, मागे खेचते. हे शास्त्रीय दृष्टीने सिद्ध झालेय. त्यामुळे, नेहमी समुद्राच्या पाण्यात जाताना ही बाब लक्षात घेऊन, खेळ करावा. नाहीतर जीवाशी गाठ होते.

       हो, आणि गंमत म्हणजे, याच गोष्टीचा फायदा, त्याने घेतला. झाले असे की, वयाच्या 18 व्या वर्षीच, तो रस्त्याने जात असताना, तेथे, एक खून झाला. आणि आळ ह्याच्यावर आला. जजने, ह्याचे काही ऐकून न घेता, शिक्षा दिली. ती ही जन्मठेप. कारण ज्यांचा खून झाला, ते बडे खटले होते. Thats why quick action. एका बेटावर त्याला रवाना केले. पण त्याने ठरवले. आपण स्वतः पळून जायचेच. त्या पलायनाच्या, सहा प्रयत्नात लागलेले हा अलौकिक शोध.  सागराचे,  चंद्राच्या कला व त्यानुसार तिथी आणि ही सातवी लाट ह्याचा जगाला होणारा उपयोग, यावर उद्या बोलू. त्याच बरोबर त्याचे हे सुटकेचे, सहा ही थरारक प्रयोग या बद्दल ही सांगेन. हे त्याने एका खुन्नस मधून प्रेरणा घेऊन केले.. त्याला ""त्या जजला " ठार मारायचे हॊते.

 तर उद्या याबद्दल सर्व यथा सांग लिहीन, तेव्हा या ब्लॉगला भेट द्याच. 

              ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू