आपल्यातील आत्मशक्ती.
आपल्यातील आत्म शक्ती
माझ्या प्रिय वाचक मित्र मैत्रीणिनो मी आज तुम्हाला एक अशी फायद्याची गोष्ट सांगणार आहे. खरे तर तुमच्या व आमच्यात एक अशी शक्ती आहे, की जिचा उपयोग, फार थोडी मंडळी करतात. पुण्य कमवण्याच्या चुकीच्या कल्पनेतून, आपल्या आयुष्याचा मोठा काळ फुकट घालवतात. नीट विचार करून, जर सामाजिक कार्य करावयाचे असेल, तर स्वतः चा आत्म शोध घ्या. हं, हे जरा जास्त गंभीर झाले नं? असो. अगदी छोट्याशा कृतीतून, तुम्ही खूप काही करू शकता. आता माझा हा एपिसोड बघा. राम कोठे आहे. तर तो आपल्या अंतरातच आहे.
याचा अर्थ, एकदा मनापासून निश्चय केला की मला काहीतरी, सामाजिक कार्य करावयाचेच आहे. तर बरोबर मार्ग सापडतो. त्यासाठी दुसऱ्या कोणाचा सल्ला घेण्याची गरज नसते. अगदी, "एकला चलो रे " असे म्हणून ही,हातून कार्य घडतेच. तेव्हा हा एपिसोड बघितल्यावर, शांत बसून विचार करा व घराबाहेर पडा. आपोआप, एखादी घटना मनाला स्पशून, प्रतिसाद रूपाने तुमच्या हातून, सामाजिक हिताचे काम होईलच होईल. तर बोला, "शुभस्य शीघ्रम ". आणि मी व माझे लिखाण कारणी लागेल.
Comments
Post a Comment