निश्चय व त्याचा पाठपुरावा.
14 जुलै 2025. निश्चय व त्याचा पाठ पुरावा.
माझ्या सुजाण व active वाचक हो,
मी आज चार. पाच दिवस म्हटले, तर वेगवेगळ्या विषयावर लिहीत आहे, पण सर्वांचा आशय मात्र एकच आहे. बघा,पुन्हा एकदा हे पाच. सहा लेख एकत्रित रित्या वाचा म्हणजे, तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हा सर्वांना active असे संबोधले. कारण मी गृहीत धरलेय, हे सर्व वाचून, तुम्ही काहीतरी करायचा, निश्चित असा निश्चय केला असेल, त्यासाठी स्वातंत्रवीर सावरकर यांना आदर्श मानून, किन्नरांची, जगण्याची जिद्द, पाहून (त्यांना, त्यांच्या जेष्ठ मंडळीविषयीची सेवावृत्ती जाणून) आपण ही आपल्या परिवाराला, किती वेळ देतो. ह्याचा आत्म शोध घेऊ या.
तसेच, मुळात आपण, आपल्याला स्वतःला किती वेळ देतो. ते शोधावा. त्यात काय, आपण स्वतः साठी तर, सर्व करतो असे म्हणाल. पण ते खरे नाही. आता कालची उज्वला बोरकरची कविता, जाणून घेऊ या.
IF AND IT.
आपण routine जगतो. पण आपल्याला नेमके काय हवे, तेच नजरअंदाज करतो, साधी गोष्ट, कित्येक जण/ जणी म्हणतात मला वाचायला खूप आवडते हो. पण वेळच मिळत नाही. ही आपण स्वतःचीच फसवणूक करत असतो. असो. बघा, ही कवीयत्री काय सांगते.
if you have dream,
believe it.
म्हणजे त्यावर विश्वास ठेवा. उगीचच काहीतरी मनात येतेय, म्हणून विसरून जाऊ नका.
If you want something.
go for it.
नुसते हे आवडते, मला हवे होते, असे मनातच कल्पना करत राहू नका. ते मिळवा.
If appourtunity comes to your way,
Take it.
कित्येकदा असे होते, वाटते,अरेच्या, तेव्हा chance होता, आणि आपण तो घालवला. ह्या after thought चा काही उपयोग नसतो हो.
if you make decision,
Stick to it.
इथे सावरकर परिवाराचा निश्चय जाणा व त्यांच्या प्रमाणे, ठाम रहा. तिघे भाऊ व त्यांच्या पत्नी कितीही संकटे आली, तरी देश भक्तीतून मागे हटली नाहीत. त्यांच्यावर कोसळली, संकटे, आपण कल्पना ही करू शकत नाही.
If its something you fear,
face it.
जे करायची भीती वाटते, ते योग्य आहे, ह्याची खात्री करून, त्याला तोंड द्या. करा. भयावर जय मिळवा. चांगले कार्य करा. इतरांना मदत करा.
आणखी काय सांगू? हां, मी माझ्या आयुष्यात बरेचसे, काही समाजासाठी केलेय. फक्त इथे तोंड पाटीलकी करीत नाही हो. बघा, Do something, God will definately bless you.
उद्या सावरकर परिवाराला आठवू या, त्या तिघी सौभाग्यवतींच्या संकट मालिका विषयी जाणू या.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment