सतत प्रयत्न, हीच यशाची शिडी. माघार हेच अपयश. साप. शिडी.

  धैर्यशील व   हिंमतवान असे थोर  महान आत्मे.

       माझ्या प्रिय सखयांनो, जसे freinds मध्ये उभयत: अभिप्रेत असतात, तसेच, हे तुम्हाला, माझे संबोधन.

         हं, तर माझ्या मते, छत्रपती संभाजी महाराजांनंतर, हेच दोघे फक्त धैर्यवान. व धर्मवीर होत. एक म्हणजे स्वातंत्रवीर सावरकर. हे तर सर्वमान्य आहेतच. दुसरे पु. ल. देशपांडे. तुम्ही म्हणाल, ते तर विनोदी साहित्यिक व नाटककार. वगैरे.. पण तुम्हाला, त्यांच्या धर्मवीरतेची महतीचा परिचय, काल द्यावयास सुरुवात केली आहेच. आता सविस्तर सांगते. सावरकर तर, मला देव व गुरुस्थानी आहेतच. पण आता पु. ल.. ना सर्वांनी, गुरू स्थानी का मानायचे, ते सांगते. सर्व साधारण, आपण सामान्य लोक एखाद्या प्रयत्नातच खचून जातो व माघार घेतो. या,त्यांच्या, पहिल्या नाटकातच किती, संकटाचा डोंगर कोसळला. पण ते आपल्या स्वप्नपूर्तीशी, चिकाटीने ठाम राहिले, यातून आपण, खूप काही शिकण्यासारखे आहे नं.

    तर बघा, संपूर्ण संकंटाची मालिका.

         तर झाले असे की त्यांची नाटकातील मूळ कल्पना अशी होती. अंधश्रद्धा दूर ठेवून, लोक मानसात जी चमत्कार रुपी "  तुकारामाची गाथा, " कर्मठानी, नदीत बुडविली आणि ती अचानक पाण्यावर तरंगत, वर आली असे नसून, त्यातील अभग, स्मरणशक्तीच्या, जोरावर, पुन्हा लिखित केले. तसेच जन मानसात ही,, ऐकून आठवत होते. तशा स्वरूपात, ती"गाथा" लोकगंगेने तारली.  पण दुदैवाने, सर्व थोर संतांनाही, 

फक्त " चमत्कारामुळेच, नमस्कार मिळतो". पण खरे तर लोकांच्या अंत:करणात, झिरपत जाणारी, त्यांची काव्यरचना, हाच मोठा चमत्कार आहे असे पु. ल. म्हणतात. पण, ही प्रॅक्टिकल कल्पना लोकांना रुचली नाही. शिवाय, त्त्यांच्या नाटकाचे नाव, " तुका म्हणे आता, " ह्यातून लोकांना वाटले, ह्यांनी नेहमी प्रमाणे काही तरी, विनोदीच लिहिले असेल, ( सिनेमातील कथानकाप्रमाणे, म्हणून आलेल्या, त्या प्रेक्षकांचा  हिरमोड झाला व नाटक उभे राहू शकले नाही.  या व्यतिरिक्त ही अडचणी आल्या, त्या ही उद्या पाहू. माझा लेख तर, interest घेऊन वाचाच. पण आपल्या पु. ल. च्या,  दुर दृष्टीने हिंमत ठेवण्याचे, अनुकरण करण्यासाठी,  हा लेख वाचाच व त्यावर विचार व मनन करा आणि ते आचरणात आणा, ही हात जोडून 🙏🙏, विनंती..

     मुख्य म्हणजे, आपल्या समाजाला, इंजिनियर, डॉक्टर, MBA बरोबरच साहित्यिक ह्यांची, गरज आहे हो. आपला समाज व हिंदुत्व एकत्रित आणण्यासाठी, हेच कार्यरत राहणार आहेत.  तेव्हा मुलांना, आर्टस् ला प्रवेश घेऊ द्यात. या क्षेत्रात,  मंडळी, अमर होतात...

      मृत्यू नंतर ही जीवन मिळते, तसेच मागील, पिढ्याचाही  उध्दार होतो त्यांना ही अमरत्व मिळते

 अमक्याचे माता व पिता, अशी ओळख मिळते.  आता बघा, संत तुका म्हणे, 

      " जया अंगी मोठे पण तया यातना कठीण "

  पण यातनांनी क्षतग्रस्त न होता, त्यावर मात केली तरच, तुम्ही "कायल ( सर्वमान्य आदर्श), नाहीतर कायर ( डरपोक). त्यावर तुमचा मोठेपणा अवलंबून आहे हे ध्यानात असू द्या. जीवनात 👍or 👎. आपणच ठरवायचे असते हो.

         ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.


Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू