राजकारणातील, उरफाटी रीत. 🤣. 😔
माझ्या प्रिय वाचक सख्या नो,
प्रथम मी, आपली क्षमा मागते. झाले असे की, माझ्या भाचीचा, 13ला वाढदिवस त्या नादात, मी, परवा, कालचा लेख, तयार करताना पुन्हा 13च तारीख टाकली त्यामुळे तुम्ही ही repeat न वाचताच skip केले असाल, तर please परत वाचा, कारण कालचा, मुद्दा फार महत्वाचा होता. मुख्य म्हणजे, सर्वांना उपयुक्त होता.
आपल्या जीवनाला, अर्थपूर्ण बनवणारा आहे.
असो. आज जरा वेगळाच विषय, घेऊन लिखाण करणार आहे. काल 14 नोव्हेंबर. हां, आपल्या जीवनातून शाळा सुटून बराच अवधी झालाय. पण आपली मुले, नातवंडे, अजून शालेय जीवनात असतील नं, निदान आजूबाजूला, राहणारी.. तर आजचा दिवस, आपल्या शालेय जीवनात, आपण," बाल दिन म्हणून साजरा केला होता आठवतेय नं...
.... तर ha दिवस, आपण, त्या नेहरूचा जन्मदिवस,, "" बाल दिन "", म्हणून साजरा करीत आलो आहोत
वर्षानु वर्षे. म्हणे," चाचा नेहरू,, ""
पण मला त्या लहान वयात ही प्रश्न पडे, महात्मा गांधी, हे आपले, "राष्ट्र पिता व नेहरू चाचा, हेच कसे??? कारण ते जर, भाऊ भाऊ असतील तर त्यांच्यात, इतके वीस वर्षाचे अंतर कसे???
गांधींचा जन्म 1869. व नेहरूचा जन्म 1889.
आणि नेहमीप्रमाणे, हा सवाल, मी माझ्या आजीला, ( काकी, माझी गुरू) विचारत असे., ती म्हणे, तु मोठी झाल्यावरच, तुला कळेल हे. आता हे कोडे सुटले. राजकारण होय. मोठेपणा. तू, मला मान दे, मी तुला मोठे करतो. 🤣🤣🤣.
हीं अशी आपल्या देश (? ) भक्तीची कहाणी.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment