धर्म रक्षण आपल्या राज्ञी चे व आज आपली धर्म तत्परता.

  धर्मरक्षण आपल्या राज्ञीचे व आज आपली ली धर्मतत्परता.


   स्वागत करते, आपण सर्व वाचक रसिकच नव्हे तर सजग आहात. धर्मजागृत आहात. छान वाटले. धर्मपरायण म्हणजे गंभीर boring life जगायचे, असे नाही, तर यात ही गंमत आहेच. तेव्हा आज इतिहासासोबत, वर्तमानावर ही नजर टाकू या. कारण आपण काही फक्त माहिती करून गपचिप बसणार नाहीत. तर सद्य परिस्थितीत त्याचा, आशय व उपाय बघणार आहोत. I mean follow करणार आहोत.


   त्या खडतर परिस्थितीत, राज्ञी येसुबाईंनी, आपल्या पुत्रांवर, स्वधर्मप्रेम व स्वराज्यनिष्ठता बिंबवली. गुप्तता राखून, प्रशिक्षित केले. स्वतः व राजमाता सकवारबाईंची व्रत वैकल्ये संभाळली. त्यातून शके महिने व ऋतु व तिथी - सणवार  यांचे सखोल ज्ञान, बालशाहूंना करवले. भावी छत्रपती या नात्याने, असलेला धर्म= धृ धारयते  इति धर्म. म्हणजे आपली समाजाशी बांधिलकी व आपण जे काही आहोत, त्या प्रमाणे आपले कर्तव्य. राजा असो- अधिकारी असो.- सेवक असो वा बाल- तरूण- पौढ - वृध्द. सर्वांचे एक विशिष्ट कर्तृत्व   विधीलिखित असते. त्याप्रमाणे वर्तन. 


     आता थोडे म्हटले तर विषयांतर  वा विषय संमत आशय.


     बघा. आजच्या बिकट परिस्थितीत. आपण बातमीवर, मग ती कोणत्या ही स्वरूपात असो, अवलंबून असतो.


     अशा स्थितीत, एखादे  "लोकमान्य" वर्तमानपत्र, आपल्या ,मुख्यपत्रात, एक लेखाला शिर्षक देत आहे कि,                                 


              धर्म , देव इत्यादी इत्यादी ( दिनां ८मे २१)


            मला सांगा, या इत्यादी दोनदाने काय INDICATE होते बरे. 


            पण बातमी आहे., इंग्लडच्या, बोरीस जॉन्सनच्या सरकारच्या, ( लेखकाच्या  मते) चुकीच्या धोरणाची. शाळा बंद असल्याने, मुलांचे माध्यान्ह जेवण बंद केल्याची. 


            तर काय झाले, एका फुटबॉल जगतातील, मार्कुस रॅशफोर्डने,फंड जमा करून, ह्या मुलांच्या जेवणाची सोय केली. हां, कौतुकास्पद आहे. पण त्या आधी त्या इंग्लड सरकारची धोरणबाबत, संदेह निर्माण करायची गरज आहे का? असो.


            आपला मूळ मुद्दा असा की, सातारच्या छत्रपतींवर, मोगल बादशहाच्या कैदेत राहून ही त्यांच्या  culture कडे आकर्षित न होता, आपले  संस्कार culture ह्याची महती व  स्वधर्म आचरण  कसे त्या माऊलीने शिकवले असेल बरे? शिवाय एक मोठा point म्हणजे, तेथील मोगलांना फितूर झालेली मराठी मंडळी व त्यांचे बादशहाकडे लांगुलचालन. ह्याप्रकाराने मराठेशाही- शिवशाही वरील उडू शकणारा विश्वास.  छ.शिवा - शंभू पुत्र असला तरी चिमुरडे लेकरू ते, पितृछत्र हरपलेले, तेही अशा प्रकारे की  एक प्रकारे, जे कळत नकळत, त्याला कारणीभूत असलेल्याच्या गोतावळ्यात, दिवस काढायचे होते.


      नुसते अरेरे अरेरे, म्हणू नका. आपण काय करतो, स्वधर्मासाठी त्याच्या संवर्धनासाठी व रक्षणासाठी, याबाबत चिंतन व मनन करा. मुलांनो, तुम्ही याबाबत काय संस्कार, स्वतः वर करताय, विचार करा.


      आपले नेते दुदैवाने चादरी घालण्यात व मेणबत्या लावण्यात गुंतलेत व तुम्ही सतरंज्या उचलण्यात, आयुष्य बरबाद करू नका. काही तरी बांधिलकी बाळगा. बस. येवढीच आकांक्षा मनी आहे. म्हणून हा blog चा खटाटोप. समजून घ्या- आवडून घ्या like - ह्या घटना प्रसारित करा-subscibe करा.  ATTRACT YOUR FRIENDS TO THIS BLOG AND THEN DISCUSS OVER THESE HISTORICAL EVIDENCES.


   तो मिलते रहिये हर रोज हरदम।

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू