सद्य परिस्थिती व छ. शंभू राजे यांच्या, बुधभूषण मध्ये सांगितलेलली परीजनांची, म्हणजे आपली जनतेची कर्तव्ये.
सद्यस्थिति व शंभुराजांच्या, बुधभुषण मध्ये सांगितलेली परिजनांची कर्तव्ये.
माझ्या देश प्रेमी वाचक बं धूभगिनींनो,
आज तर मन उदास आहे 26.11 चा, मुंबईतील बॉम्ब हल्ला आठवून मन उदास होत आहे पण म्हटले तर आज जे मी लिहिणार आहे,, ते ह्याच संबंधी आहे. छ. शम्भू राजेंनी, या बाबतील आपली जनतेची, जी कर्तव्ये सांगतली आहेत ती समजून व उमजून घेऊ या.
काल मी मं त्र पुष्प+अंजली बद्दल लिहीन म्हटले होते. पण पूर्वी राजे शाही असल्याने, परिजन, त्या परमेश्वरा कडे योग्य प्रशासक मागत पण आज लोकशाहीत, आपल्याला, योग्य प्रशासक निवडण्याची, सुविधा आहे.तर आपण तो फायदा करावा, ही विनवणी.
त्या काळी, कोणी एक , "खंडुजी आपले मराठी छत्रपतीं संभाजीमहाराज, मोगल शाहजादा आझम व आसदखानच्या जाळ्यात, स्वकियांच्याच फितुरीने, फसल्याची खबर देण्यास, बादशहाकडे धावला, अन् बिदागी घेऊन खुश झाला. असेच दुष्कृत्य करायला, म्हणजेच सतरंज्या उचलायला, आज अनेक (?) वीर सज्ज असतात. पण खरे तर त्या अजाण मुलांचा काही अपराध नसतो. असलीच तर, योग्य मार्ग न सापडल्याने झालेली चूक असते. कशी ती सांगते. त्यासाठी, २०.२१ वर्षे मागे जावे लागेल. तथाकथित सरकारने, अचानक शिक्षणविषयक निर्णय घेतला, निर्णय कसला, त्या काळातील विद्यार्थांना, अभ्यास करण्यापासून, दूरच केले, म्हणा नं. असे ठरले कि, १ ते ७ वी पर्यंत, शाळातून परीक्षा घेऊ नयेत. सर्वांना पास करायचे. या महाराष्ट्र सरकारच्या सरकाराच्या ठरावाने, काय झाले कि, मुले अभ्यास करेनाशी झाली. basic काळात पाढे - कविता- वाचन या कडे पार दुर्लक्ष झाले व पुढे ८ वी ९ वी त गणिते- जोडाक्षरे वाचन व लेखन जमेनासे झाले. परिणामतः कित्येकजण जेमतेम दहावीच्या काठावरच पोहोचू शकले अन् पुढे ठप्प! हे मी ऐकिवातली कथा सांगत नाही. मी व माझी मैत्रीण , नलिनी आरेकर, त्या काळात मालाडला, under privileged मुलांसाठी संस्था चालवत असू. तेव्हा हा अनुभव आला. त्यावेळी कोणी ही राजकिय व्यक्ती पाठीशी उभी नव्हती. कोणी सर्वतोपरी मदत केली माहितेय, ज्यांना आपण मराठी मंडळी, " चिक्कू मारवाडी" म्हणतो, त्यांच्या , "राम लिला प्रचार समितीने".राजस्थानी.
-प्रशस्त जागा मुलांना आहार वह्या व जेव्हा जे आवश्यक असेल ते.
हेच कार्य या बुधभुषण ग्रंथात, १५ वर्षाच्या शंभुराजांनी, राज कर्तव्य म्हणून नमूद केले होते. असे या धर्मपरायण राजाने लिहीलेले, राजा व प्रजा ह्याचे अधिकार व कर्तव्य काल वाचलेच असेल. आज ही जनतेची कामे खाली देत आहे. दोन्ही कालचा व आजचा एकत्रित लेख वाचा व विचार करा. आजूबाजूच्या नोकरीच्या शोधात असलेल्या मुलांना जरूर जरूर वाचायला द्या. या १८ते २१ गटातील, मुलांना मतदानाचा अधिकार तर मिळतो. पण चरितार्थाचे साधन सहजगत्या मिळत नाही. मग भांबावतात. त्याचा फायदा होतो, नेतेमंडळींना. हां, याबाबत- मतदानाच्या वेळी-वापरायचा जो , " नोटा" चा अधिकार असतो. तो माहित नसतो. तसा तर हा प्रकार कित्येक शिक्षित पौढ मंडळीना ही ज्ञात नसतो. मग या drop out मुलांची काय स्थिती? तर शंभूराजेंच्या " बुधभुषण" मधील पुढील भाग ३ भागात अभ्यासू या.
तर like -
, हा माझा BLOG मानसिक व सामाजिक व बौध्दिक बाबतीत. Follow करणार नं, बघा फायदा तुमचाच आहे, जर सहजगत्या कायदा जाणकार झालात तर? खाली दिलेले, शंभू राजांचे लिखाण वाचा - वाचाच.
काल आपण राजा कसा असावा, याबद्दल शंभुराजे काय सांगतात, ते पाहिले. पण असे आहे कि, टाळी नेहमी दोन हातानेच वाजते. सहाजिक राजाला, प्रजा ही तेवढीच निष्ठावान व श्रध्दावान मिळणे, गरजेचे आहे. राजाने जे नियम केले असतील, ते प्रजेने पाळणे, महत्वाचे आहे.
मेधावी, मतिमान, दीनवदनो', दक्ष, क्षमावान, ऋजु: ।
धर्मात्मा, अपि अनुसुयको,लघुकर:,
षाङग़ुण्यविद्, शक्तिमान् ।
उत्साही पर रंध्रविद् कृतधृति:, वृध्दिक्षयस्थान् विद् ।
शूरो, न व्यसनी, स्मरति उपकृतं, वृध्दापसेवी च य:।। २ ।।
हा श्लोक कालच पाहिला, परत कशाला, असे वाटले ना? पण आपल्या नागरिकांना , ह्या दृष्टिकोनाची गरज आहे. एक एक राजाचा गुण पुन्हा नजरेखालून घालून, आपले कर्तव्य काय आहे, ते पाहणे गरजेचे आहे. नाहीतर राजा कितीही ज्ञानी, प्रजाहिततत्पर असून जर प्रजा-- जनता कपाळकंरटी असेल. राज्याचा विकास कसा होणार? आपले मुख्य मंत्री, जो विकास करीत आहे, तो न बघता, त्यांना जातीवरून शरीर यष्टी वरून टीका करणे त्यांच्या पत्नीवर नावे ठेवणे. हेच चाललेय. आता सरकार व महानगरपालिका यांची क्षेत्रे व नियम ठरवलेले आहेत, तर ते नागरिकशास्त्र जाणून न घेता सरकारवरच टीका करणे.
आजवर आदिवासीची आठवण ही असणारे पक्ष, निवडणुकीखातर तेथे जाऊ लागले आहेत. त्यांना साथ देणे, वगैरे आपलेच नुकसान करणारे आहे. He समजणार कोणाला??
तर आता बघु या. राजाच्या वरील गुणांची जर आपल्याला अपेक्षा असेल, तर आपल्यात, त्यासंबंधी मिलाफ देणारे गुण (सरळ शब्दात match होणारे), आहेत का?
मी शेवटून वर जात आहे. गोंधळ वाटला तर कालचा लेख refer करा. राजा, आजच्या काळात सरकार-- पंत प्रधान व मुख्यमंत्री. ते जर वयोवृध्दांचा आदर करणारे हवे तर sr. citizens नी ही त्यांनी लावलेले, नियमानुसार,पालन करून पुढच्या पिढीसाठी आदर्श होणे, आवश्यक आहे नं?
एक उदाहरण सांगते, दादरच्या शिवाजीपार्कमध्ये पत्रकार दाखवत होते. तेव्हा एक SR.CITIZEN त्यांना भेटले, विचारल्यावर बोलतात, " मी ६वाजताच आलो.
७ वाजता ते सुरू होणारे नं, ७ला अजून ५मि.बाकी आहेत. मी जवळच राहातो. २मि. त घर
असेच अनेक वयस्क महाशय नाशिक पुण नागपूरच्या रस्त्यावर आढळून आले. तेच जर कायदे पाळत नसतील, तर पुढच्या पिढीने तरी त्यांचा मान का ठेवावा? छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराजांच्या सांगण्याला मान देऊन, आदर्श मावळे, I mean, नागरिक बना.
नियम पाळून, अशा परिस्थितीत, जीवावर उदार होऊन कर्तव्यतत्पर राहणार्या पोलिस, वैद्यकी अधिकारी व सफाई कामगारांना मानवंदना देण्यासाठी तत्पर रहा. त्यांच्या कार्यात बाधा न आणता, त्यांना साथ द्या मग रस्त्यावर घाण करणे थुंकणे, पोलीस शोधात दूर राहणे, आम्ही नायबा, ही वृत्ती सोडा.
तिसरे उदाहरण, फेसबुकवर तारे तोडणार्या महाभागांचे म्हणणे, काय तर त्यांना नावे ठेवणे, हेच फेसबुक वर करणार. आता काय डोके फोडायचे, असल्या भंपक विचारसरणी समोर. तिथे paid टीकाकार होण्यापेक्षा, लेखन शैली वाढवा, चांगल्या शब्दात साहित्य निर्मिती करा
एक आणखी छोटेसे उदाहरण. छोटे म्हणायचे, कारण मुले लहान आहेत. पण एक नक्की major आहेत. आज पुर्ण फेसबुक गंभीर विचाराने भरले असताना, हा फोटो समोर आला. कसा तो अंदाज लावा म्हणे ,अशी असावी , दोस्ती. अजून आपल्यात भावंडात ही अशी जवळ येण्याची तितकीशी प्रथा नाही.. तरी आज तेथे जेष्ठ नागरिक ही अशी जवळीक करून,असे फोटो टाकत आहेत.
तरी, मला अंधश्रध्दाळू म्हणा. हरकत नाही. पण आपल्याला माननिय मोदींजी व माननिय शहां जी पंतप्रधान व गृहमंत्री लाभले, हे आपल्या देशाचे व राष्ट्रनिष्ठ नागरिकांचे सौभाग्य आहे.. महाराष्ट्र हा विकसित होत आहे. माननीय. नितीन गडकरीच्या कल्पकतेमुळे, रस्ते मेट्रो पूल उत्कृष्ट होत आहेत. त्याचा लाभ घेत आहात. पण त्यांची प्रशंसा करा. निदान नावे ठेऊ नका. आपली लायकी व वय समजून, आपले जीवन योग्य मार्गी लावा. मग स्वबलावर आधी काही तरी करून दाखवा. स्व धर्म, म्हणजेच स्व कर्तव्य करा सामाजिक जबाबदारी पाडा. हेच बुधभूषण मध्ये सांगितले आहे. योग्य वेळी व योग्य जागी आवाज उठवा. हे मोर्चा व सभा हजेरी, त्या वेळी मज्जा वाटेल. पण ह्यातून आपण आपलेच भविष्य बरबाद करतो, हे समजून जगा.. उद्या, यासंबधीचा श्लोक व मंत्र पुष्प+ अंजलीचे मर्म सांगेन. शेवटी 26.11 च्या मृत्यू व शहीद जणांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏. ॐ शांति.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment