आपले गुरू कसे निवडाल.. इति रामदास स्वामी रामदास स्वामी भाग 2.
आपले गुरू कसे निवडाल रामदास स्वामी .भाग 2
मम सुजाण वाचक हो. काल दासबोधातील ओळी, मी लिहिल्यातत्या संदर्भा साठी पाहत रहा. म्हणजे हे समजायला सोपे जाईल
सभामोहन मुररे चेटकें।
साबरमंत्र कौटाले अनेके।
सभा, मोर्चे घेऊन तसेच आज media फेसबुकवरील लेखक असतात, काही विरोधी, अपयशी पक्षाच्या नेत्यांचे paid चेले, मग त्यांचा हाच उद्योग, यशस्वी नेत्यांना बदनाम करणे. तसेच एक विशिष्ट नेता,अज्ञानी dropout मुलांना, चिरीमिरी देऊन, आपल्या कह्यात आणतो. आणि त्यांच्या हातून अपराध घडवतो. आणि नंतर ते बिघडल्यावर वाऱ्यावर सोडतोय. थोडे दिवसापूर्वीच, मराठी न बोलण्याऱ्याना व मोर्चाला (😄) जाण्यासाठी, सुट्टी न देणाऱ्या, मालकाला, थोबाडीत द्या, असा आदेश दिला, अन या मूर्ख गुरूचा, शत मूर्खांनी त्यानुसार कृत्य केले. आणि स्वतः ची पोलीस चौकीत नोंद करवली. त्या आरेच्या मोर्चे कंपनी प्रमाणे, नोकरीं मिळवण्यासाठी वांदे करवून घेतलीय.नंतर "हे" नेते
कुगुरू हात झटकतात. रामदास स्वामी ह्या असल्या "कुगुरू" पासून सावधान करीत असतात.. पण कोण लक्षात घेतो.
तसाच "अपरोक्ष" शब्द बर्याच वेळेस उलट अर्थाने वापरला जातो. खरे तर जसे दोन नकार, " होकार" ठरतात.उदा. त्याप्रमाणे. परः+ अक्ष= डोळ्याच्या परे - मागे व "अ" लागल्याने, पुन्हा परोक्ष नसलेला= डोळ्या देखत. असा अर्थ होतो. माझी एक इच्छा आहे, तुम्हा वाचकांकडून अपेक्षा आहे, जमल्यास सर्वांनी थोडेफार संतवाङमय वाचावे. त्यासाठीच त्यातील, काही भाग, मी येथे देत राहणार आहे. हे खरे कि, मी त्यांच्या कडून जे जे ज्ञान मिळते, ते ते आपल्यापर्यंत hand over 😉 करीत आहे. तुम्ही ते गोड मानून घेत आहात, हे माझे भाग्य! कर्ताकरविता "तो " आहे.
तर मग, तुम्ही सदैव भेटीस याल व माझे सांगणे, ग्रहण कराल I mean समजून आपलेसे करत आहात, हेच समाधान. हो आणि आजूबाजूला दिसणाऱ्या अशा चुकीच्या गुरू च्या, नादी लागलेल्या,अजाण बालकांना, सरळ मार्गाला आणा, बरे का!
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment