जाहिरात ही कला ही या 64 कलात सांगितलीय, बरे का!
जाहिरात, आजच्या जमान्यात मान्यता असलेली एक कला.
माझ्या जागृत ज्ञानप्रेमी वाचक हो, मला तुमचे खूप कौतुक वाटते. कालचा, योगिनींचा गंभीर विषय असून ही, मला असंख्य वाचक मिळाले. तसे तर माझे ही कौतुक करायला पाहिजे. 😊 असो.
आज मी सांप्रत जिकडे तिकडे चोहीकडे दिसून येणाऱ्या, कले बद्दल सांगणार आहे. ती म्हणजे जाहिरात. आपण समजतो, तशी ती नवीन नाही, या 64 कलामध्ये सांगितलीच आहे. त्यातील 16वी आहे, "आकर्षण. हां सर्व जणांना, आकर्षण म्हटल्या वर मुलामुली च्यातले आकर्षण च आठवते नं, नाही हं, ह्याचा अर्थ व्यापक आहे. म्हणजे आपले म्हणणे, दुसऱ्या ला पटवणे, आपल्या मताकडे वा पक्षाकडे ओढून घेणे. आपलेच कसे बरोबर आहे, ते इतरांना पटवणे. जाहिराती दुसरे काय करतात बरे? साडया, ड्रेस च्या सेल मधून आपला माल खपवतात. Branded मालाकडे सर्व जण, तोंड महाग असूनही धावून धावून घेतात नं, काय तुम्ही सुध्दा sorry पण चूक आहे का? आजकल शिक्षण पण... क्लासेस च्या जाहिराती तर जोर लावून, सर्रास झाल्यात पण शाळाही या जाहिरात बाजीतून सुटल्या नाहीत, AC वर्ग लिफ्ट स्कुलबस, पिकनिक्स त्याही by air. सर्व पैशाचे खेळ. पण आपण आकर्षित होतोच नं. आणखी एक मजेशीर कला. 31वी कला. छलिक योग. अर्थ स्पष्ट केलाय, चलाखी करून हातोहत फसवणे. ही negetive नाही तर एक प्रकारे positive स्वरूपात सांगितलेय. Ha पण एक प्रकारच्या बुद्धीवानाचा खेळ आहे. जे प्रज्ञावंत असतात त्यांना, जर वेळेवर चांगले vln लावले, नाही, तर ते अशी बुद्धी वापरतात. ह्यात हेरगिरी वेशांतर अशा चांगल्या बाजू ही येतात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांनी औरंगजेबाच्या डोळ्यात धूळ फेकून आग्रावरून सुटका करून घेतली ती चलाखीच नं! फसवणूक ही अशी शत्रूची करावीच लागते.. तेव्हा परतीच्या मार्गात, त्यांनी आपल्या मनावर दगड ठेऊन, आपल्या लाडक्या, शंभूराजेंना सुरक्षित ठेवण्या साठी, "" पुत्राचा " काळ " झाला ही बातमी पसरवली त्यात चलाखी होती नं तेव्हा ही कला आहेच. आपण नाटक सिनेमा बघतो. त्यातील अभिनय ही चलाखी युक्त कलाच होय. जे आपण नाहीत, ते आहोत , हे दाखवणे ही तर जबरदस्त कला च होय..
आता आणखी एक कलेची मजा बघा. आपणातील सर्वच करत आहोत, ही एक प्रकारची फसवणूक, म्हटले तर, इतरांची तसेच स्वतः ची. कृपया, राग मानू नका. त्या देवळात व गुगल मध्ये वापरलेले शब्द च लिहीत आहे. आपल्या कानी खडे हं 😄
17 वी कला. कौचुभार :- कुरूप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनवणे. आजकाल ची bauty पार्लर.
24:- काया कल्प - वृद्ध व्यक्ती ला, तरुण करणे, म्हणजे अर्थात कलप फेसिअल वगैरे..
हां, मी यात नाही हं. माझा फोटूच दाखवते.
मला आपले आज्जी म्हटलेले आवडते. काही जणीना, आजी म्हटलेले आवडत नाही, मग त्या नातवंडाना, "आई "म्हणायला लावतात ही , एक प्रकारे स्वतः ची फसवणूकच होय. आजकाल आया,"मम्मी झाल्यात, त्यामुळे, चालू शकते पण मराठी विषय शिकताना, त्या बिचाऱ्या मुलांचा गोंध होतो नं! कालाय तस्मै नम :!
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

Comments
Post a Comment