राणी येसूबाई व मातोश्री सकवार बाई समवेत बालशाहू यांचे छावणीतील वास्तव व वास्तव्य.
राणी येसूबाई व मातोश्री सकवार बाई समवेत बालराजेंचे छावणीतील वास्तव व वास्तव्य.
सजग व इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक वाचक हो, काल आपण महाराणी येसूबाई यांच्या धीरोदात्त व त्या परिस्थितीत योग्य असा निर्णय जाणून घेतलात नसेल, तर मागे जाऊन नक्की वाचा.
बादशहाला, शिवाजीचे नाव मुखी नको होते. म्हणून बालशिवाजीराजे, " शाहू" बनले व
त्यांचे छावणीतील जीवन, कसे व्यतित झाले. ते पाहू.
बादशहाची छावणी. मजल दरमजल करीत, सरदार झुल्फिकारखान, राजकैद्यांना घेऊन डेरे दाखल झाले.
छावणीत शिरल्यावर, मातोश्री सकवारबाईसाहेबा व राज्ञी येसुबाईंना धक्काच बसला. मोगल शिपाईंच्या सोबत जवळजवळ, त्याच संख्येने, आपली मराठी मंडळी ही तेथे दिमाखाने वावरत होते. राजे तर लहान होते. पण येसुबाई तर जाणत्या होत्या. त्यांच्या लगेच मनात आले. ही तर उघड छावणी आहे. इथे तर काही बंदिस्त चालत नसावे. म्हणजे~ मग जेव्हा, स्वारींच्या बाबत ते s ते वध झाला-- धर्म बदलण्यासाठी, त्यांचे व कवि कलशांचे हाल हाल केले गेले, ते ह्या सर्वांच्या उपस्थितीतच घडले असावे तर-- मग परक्या कलशांनी आपले डोळे फोडले- जीभ कापली तरी स्वामींची साथ सोडली नाही.~ पण हे सर्व स्वकिय बघत बसले असतील का? फक्त वतनासाठीच का? स्वहितासाठी स्वधर्म - आपले राजे- ह्यांच्यासाठी, " प्राण घेतले हाती", ते मावळे हेच का? जर हे आता इथे असलेले व मराठी जन्म घेतलेले, त्या वेळी एकत्र झाले असते तर~~ तर आज स्वामी जिवंत असते. मग ह्यांनाच खरे स्वराज्याचे शत्रू म्हणावे लागेल. आपल्याला या (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गनीमा) गोतावळ्यात राहून बालराजेंना घडवायचे आहे. सुदैवाने आपल्याला, मातोश्री सकवारबाईंची साथ व आशिर्वाद लाभले आहेत.
नक्कीच
उगवतीच्या डोईवरी
तुरा सुर्याचा डोलतो.
नारायणाचे रूप घेऊनी
धरतीला गा धरतीला
अन् इरसरीने चांद संपवी,
रातीला गा रातीला.
--कवन -- सुमिता कर्णिक
हे सपान पुरे झालेले पाहूच, आम्ही या डोळी या देही. आबासाहेबाच्या नंतर दोन वरीसाने, पुत्रकामेष्टी यज्ञानंतर हे " शिवाजीराजे" पोटी आले, ते काय उगीचच असेल? तेच नव्हे तर पुढील ७.८ पिढ्या अबाधित राज्य करतील, या मराठीशाहीत. मग भले प्रशासन पध्दतीत बदल झाले तरी जनमानसात अधिराज्य करतील.
हे भाग जरा लांबणार आहेत, कारण ह्या घटना मुळतः, थोडक्यात गुंडाळण्यासारख्या नाहीतच. एकदा तुम्ही, interest घेऊन वाचता आहात, तर मलाही details मध्ये सांगायला हुरूप आला आहे. हे सत्य जास्तीतजास्त लोकांपर्यत पोहोचणे, आवश्यक आहे. तेव्हा कॄपया हा माझा ब्लॉग सर्व नातलग व मित्रमैत्रिणींच्या बरोबर SHARE करा. इतिहासातील सत्य जाणून घ्या. आपल्याला हा सातार्याचा इतिहास,पुढच्या पिढ्यापिढ्यांपर्यंत पोहोचावयाचा आहे. 🙏🙏🙏.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment