गुरू कसा असावा, गुरूंचे संस्कार व स्वतः ची वागणूक कशी असावी.
गुरू कसा असावा गुरूंचे संस्कार व स्वतः ची वागणूक.
माझ्या सजग वाचक हो, ही फार पूर्वीची गोष्ट आहे. पण आज त्या नेत्याची टिवटिव-- ज्याच्या त्याच्यावर (sorry for the word ) भुंकणे, पाहताना एक आठवण आली.
. गुगलवर एक बातमी वाचली. एका राजकिय नेत्यावर,दुःखाचा डोंगर कोसळला. वाचून मनात काय आले असेल बरे? मला तर खरेच धक्का बसला, वाटले कोणीतरी घरचे, तसे त्या परिवारातील, सर्वच वयाने लहानच. पण पूर्ण बातमी वाचली तर, त्यांचा पाळीव कुत्रा गेला. ही त्यांच्यासाठी, दुःखाची बाबच .पण जनतेला, असा" धक्का" देणे, कितपत योग्य आहे? असो. आमचा पण , "केव्हिन"ने ही ( कुत्रा) माझ्या वडिलांच्या मृत्यु नंतर लगेच तासाभरात, त्याने प्राण सोडले. पण ते दुःख फक्त आमचेच होय.
हे पत्रकार, आपल्या, जीवनात कशाला व केव्हा घुसखोरी करून, फालतू बाबींना किती महत्व देतात हे विचार करण्यासारखे आहे.
कालपर्यंत आपण गुरू( शिक्षक) व शिष्य( विद्यार्थी) संबंध कसे असावेत. हे बघितले. ते आपल्यावर संस्कार करतात. आपला धर्म= वागणूक कशी असावी, ते शिकवतात. इथे शिक्षक म्हणजे शालेय व कॉलेज जीवनातीलच गुरू, मला अभिप्रेत नाहीत. तर All persons around us , who are effictive for our good life.
मी परवा एका व्यक्तीचे, धर्म पालन करण्याबाबत कौतुक केले. जरा आता आपण आत्मकेंद्रीत होऊन, आपल्या बाबत आत्मपरिक्षण करू या. जेव्हा भाद्रपद येईल. श्रावण ही.दोन्ही महिने आपल्यासाठी सणमास आहेत. सर्वात महत्वाचे सण म्हणजे कृष्णाष्टमी व गणेशोत्सव आणि एक महत्वाचा - पितृपक्ष. अं, काय म्हणता, हा काय सण आहे? हेच आपण जाणून घेत नाही नं! आपले जितके पितर आहेत, समस्त कुळातील/कुळातीत, त्यांना , आपण जे अर्पण वा तर्पण करतो, त्यात THANKS GIVING ची भावना असायला पाहिजे. पण आपण तसे करतो का? नाही. त्यांची आपण एक प्रकारे भीती पोटी शांत करतो. पण तो होलोविनचा FESTIVAL( हा ही याच अर्थी केला जातो.) पण आपण मुर्खासारखा, तो घरी दारी शाळातून celebrate 😁😂🙃😂 करतो.
या दहीहंडीला याच नेत्याने तारे तोडले, म्हणे,मला दहीहंडी पेक्षा मटण हं डी आवडते, हे सच्चा हिंदुने कधीही विसरू नये.
उद्या आता मी माझ्या मालिकेमधून कृष्णाष्टमी - दही हंडी आणि गणेशोत्सवाचे सत्य स्वरूप सांगितले. ते उद्या ऐकाच. विचार करा. आपल्या या दोन्ही ( देव व पितर) या गुरूंचा सन्मान करा, ही हात🙏🙏🙏 जोडून विनंती.पितृ पक्षात फक्त वांशिक पूर्वजच नव्हे तर शास्त्रज्ञ यंत्रज्ञ शेतकरी सर्वांना धन्यवाद द्या
मला माहित आहे, ही वेळ दूर आहे पण आता पासून, हा विचार पसरवा. आणि बातम्यावरआपणच नियंत्रण ठेवू या. कसे ते आपले आपण ठरवा. या राजकीय आवाहनचे बळी होऊ नका. गुरू कसा असावा, शिष्याla योग्य वळण लावणारा. आजूबाजूच्या मुलांना सावध करा.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
Comments
Post a Comment