बुध भूषण या ग्रंथामधील छ. संभाजी महाराजांचा बहुमोल सल्ला
बुधभूषणमधील छ. संभाजी महाराजांचा बहुमोल सल्ला.
काल आपण पाहिले जर आपल्याला, जीवनात काहीतरी चांगले करायचे असेल, तर मुख्य आपल्याला स्वतःला ओळखा. आपली योग्यता व क्षमता जाणून घ्या. मुख्य म्हणजे सद्य परिस्थिती जाणून घ्या. यात काय अडचणी येऊ शकतात. त्याचा आढावा घ्या. त्यानुसार पावले टाका. उगीचच नसते साहस, अपयशी करू शकते. बुद्धीबळ खेळताना माघार घ्यावी लागते नं? तेच महाराणी येसूबाईंनी केले. रायगडावरील स्वराज्य निष्ठ मंडळी सुखरूप राहणे, गरजेचे होते.
मी नेहमी एक श्लोक सांगते. "राम"चा अर्थ क्षमता. त्याची खरी दखल घ्या.
मी छ. शंभुराजेंच्या या, "बुधभूषण" ग्रंथाची आपल्या वाचकांना करून द्यावयाची ठरवली. ती सर्व लहान मोठ्यांना फायद्याची होणार आहे.
शंभुराजेंनी प्रारंभी ईश स्तवन करताना गणेश, शिव शारदा या देवतांबरोबर गुरूंचे स्तवन केले. त्यात त्यांनी गुरू कसे असावेत. हे सांगितले आहे. हे वर्णन छत्रपती संभाजीमहाराजांच्या व्यक्तीमत्वाचे नेमके दर्शन दाखवत आहे.
बघा हा श्लोक हं,
अज्ञानकृष्णसर्पेण, दंशिता भुवि मानवाः ।
तेषां जीवनहेत्वर्थे, नौमि जांगुलिकं गुरूम् ।। ४ ।।
या जांगुलिकं शब्दाला अडले मग शोध लावला..
तर जांगुलिक म्हणजे विष उतरवणारा तज्ञ वैद्य.
ह्या जगतातील माणसांना, जणू अज्ञानाच्या कृष्णसर्पाने डंख मारला आहे. त्यांना जिवंत (मनाने) ठेवण्यासाठी , " गुरूरूपि विषवैद्यकांची (सर्पाचे विष उतरविणार्या) हेतूपूर्ण निवड करावी लागते. त्याला शरण जाणे, हितकारक असते. ते, " जाऊ देत झाले,"न म्हणता. जाणून घ्या. माहिती साठवायला जास्त
" जागा" लागत नाही हो. उलट ती कोणाला सांगता येईल. तेव्हा आणखी एक माहिती, ती म्हणजे जर साप चावला तर, घाबरून न जाता, तो विषारी होता का? ते शोधायचे. हे ज्ञान, मला आदिवासी आश्रमात काम करताना मिळाले, ते सांगते. एक तिखट मिरची खायची, जर तो साप विषारी असला तर, मिरची गोड लागते. मग धावपळ करायची. गंमत बघा. आपण जेव्हा, माहिती न काढता, अज्ञानात,आनंद मानतो, जाऊ देत,झाले. मानतो. तेव्हा नेमके हेच घडते. आपण अजाण राहतो. आणि कधी तरी त्यामुळे नुकसान होते. 😔. तेव्हा माहित नाही, ते जाणून घ्या. जरा हल्ली लेख गंभीर होतात, मान्य. पण उपयुक्त आहे नं? ओके उद्या पासून जरा गंमतीचे लिहिणार आहे. तर भेटूच. सध्या tech कारणाने, लेख तयार असून, upload होत नाहीत,त्या बद्दल क्षमस्व.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment