स्मरण शक्तीचा चमत्कार. देवाची अद्भुत लिला. आजही, मी तिला नाव विचारायला विसरले..
13मार्च, 2026 12मार्च च्या दिवशीच आम्हा,, एकमेकांना, अनोळखी असलेल्या लोकांकडून घडलेले , माणुसकीचे कार्य.
माझ्या सजग वाचक हो,. कालचा लेख वाचला असेल, तरच, आजचा समजून येईल. तेव्हा तो वाचाच.
खरे तर त्या बॉम्ब स्फ़ोटच्या घटनांमुळे सर्व स्वतः च्या विवंचनेत होते. पण कदाचित त्याचमुळे तिचे दुःख समजून, एकप्रकारे mass behavier काम झाले...जरा विषय बदलतेय. पण, या संबंधीच आहे.
माझ्या आयुष्यात,. मी,महाराष्ट्र मध्ये अशा दोनच व्यक्ती जाणते, त्या बायकोच्या करियरमध्ये सक्रिय साथ देतात, हां, south इंडियन मध्ये बरेचसे आहेत. पण...एक माझे मेव्हणे विजय कुळकर्णी ब हे मीना शहाचे पती, अनिल शहा. मीनाला ऑफिस मधून ऑडिटला जायचे होते, तर त्यांनी दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली.आम्हाला compulsury नसते.
तर आता आपण मूळ विषया कडे वळू या.
त्या दिवशी तिला( कालचा लेख वाचलाय नं कोण ती कळले नं ), त्या पालघर च्या शिक्षिकेने, ट्रेनमध्ये बसविले. आणि आम्ही तो विषय विसरलो. पण
मी त्यानंतर तीस वर्षाने अजिंक्य toor सोबत देव दर्शनाला गेले. गाणगापूर कोल्हापूर सांगली औदुम्बर आणि मुख्य म्हणजे पंढरपूर वगैरे.
त्यादिवशी 12 मार्चला, आम्ही कोणीच तिला नाव विचारले नव्हते. ( ती कोण या साठी कालचा ब्लॉग वाचा. हां, तर पंढरपुरची गर्दी पाहिली व मी ठरवले. यात शिरणे, मला शक्य नाही. मी मॅनेजर, आकाशाला म्हटले, मला कोठेतरी असे बसवा की मला शिखर दर्शन होईल. सर्व बरोबरची व स्वतः आकाश म्हणे,आज्जी आम्ही, तुम्हाला नीट नेऊ. चला हो. तसे पास काढलेत. गर्दी कमी लागेल. पण का कोण जाणे. त्यांची नाराजी बघून ही, मी नकारच दिला. बहुदा आतून आदेश आला. मग त्या मॅनेजर, आकाशने मला एका बंद मॉलच्या पायऱ्यावर बसवले व मला सांगितले,, ""तुम्हीं जरा इथे बसा. मी सर्वांना, special रांगेत सोडून येतो ",
आणि गंमत तर तेव्हाच झाली.
एक 35.40 ची बाई, माझ्या पुढे आली, हाताशी एक 8.9 वर्षाचा मुलगा. अक्षरश: त्याला खेचत माझ्या भोवती, मागे पुढे फिरून मला बघू लागली. मी घाबरलेच. वाकून बघे. तुमचे केस... आणि, त्या पोराला म्हणाली," जाय बिगी बिगी आज्जेला घेऊन ये."
आणि ती जरा लांब जाऊन, माझ्याकडे नजर ठेवून होती. तेवढ्यात आमचा मॅनेजर आला.व मला समोरील गजानन महाराजांच्या आश्रमात घेऊन गेला. तेथे वाचनालयाच्या जवळ नेले. व समोर बाके होती, तेथे बसवले. आत ही जाऊ शकाल, बोलला.
मी आरामात बसले. तेथून मेन गेट ही दिसत होते. तो बाहेर पडला आणि लगेच मघाशीची बाई आत शिरली, बरोबर एक म्हातारी व तो मुलगा. त्याने माझ्या कडे बोट दाखवले अन दोघी धावत माझ्या कडे येऊन माझ्या पाया पडल्या. आता मी हादरले. मी विचारले " कोण तुम्ही? काय पाहिजे? पैसे... "
त्या म्हातारीने अजिजीने विचारले, " बाय, मला वळखलं नाही जीं.. आपण पालघरला भेटलो व्हतं नं! "
त्या स्फ़ोटच्या दिशी व्ह?
तेवढ्यात ती मघाशीची बाई बोलू लागली, " मी तुम्हाला लगीच वळखलं, ट्रेनामधी,माझी लहानी बहीण तुमच्या मांडीवर झोपली अन मी त्या हिरव्या ड्रेस मधील मडमच्या मांडीवर बसली होती, नव्ह. तुम्ही दवा लावली बघा? आणि एकदम मला, तो 12 मार्च 1093चा दिवस आठवला. ती बाई म्हणजे, ती,तेव्हा फक्त 9वर्षाची लहान मुलगी होती. मग म्हातारी बोलू लागली ,तुमचे उपकार कसे बिसरणार हो. नंतर मला तिसरी मुलगी झाली. माझी वहिनी लयी चांगली बघा. आसरा दिला. अशी वहिनी भेटायला नशीब थोर लागते. कुठे नाय मिलायची हो, बघा"., मी म्हटले,' मी पण अशीच नशीबवान आहे. मला ही देवाने अशाच दोन , वहिनी दिल्यात बघ ग."" ती माझी जीवन घटना सांगीन च कधीतरी.
पण आश्चर्याची, गोष्ट म्हणजे त्यावेळी लहान असलेल्या मुलीने, तीस वर्षाने मला कसे ओळखले असेल? माझे केस पां ढरे व कटं केल्याने लहान, आता चष्मा लागलेला. कदाचित त्या जीवघेण्या प्रसंगातून सूटल्याच्या व नंतरच्या निवांत वेळी सतत मी समोर दिसल्यामुळे, स्मृतीत मी कोरली,असेल. मुख्य म्हणजे ती ज्या मीनाच्या मांडीवर होती, तिचा हिरवा ड्रेस. अजब लिला देवाची.
हां त्याकाळात, बहुदा पंजाबी ड्रेस घालणे,खूप कमी
पण तिच्या आठवणीत ते बरोबर होते. मीना ड्रेसच घालत असे..
चमत्कारच हा.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment