दादरकर मुलांमुलीचा गुरू. स्वागत आहे, माझ्या प्रिय वाचक हो, परवा, माझ्या बहिणीची पदवीधर होण्याची जिद्द बघितलीत नं? आता मी तुम्हाला शिक्षण विषयी, एक गंमतीदार खरी घटना सांगणार आहे.आमच्या लहानपणीची. खरे तर अभ्यास करणे, त्या शालेय जीवनात काही आवडीचा विषय नसतो. मी दादरच्या खांडके चाळीत राहत होते. खांडके 5 नं. मध्ये, मजल्यावर नऊ बिऱ्हाडे. आम्हाला अभ्यासू बनवण्याचे श्रेय कोणाला जाते,कल्पना आहे का? पुढे वाचून हसाल, हसा बापूडे. पण हे सत्य आहे की,दर दिवसा आड येणाऱ्या, डब्बेबाटली वाल्याचे, हे महान कार्य होय. आता सविस्तर सांगतेच, ऐका, I mean वाचा. तो काळा कुट्ट, दातपुढे त्यात ही एक दात सोनेरी, खांद्यावर कळकट पोते. एक डोळ्यात पांढरे.. एकूण भयानकच. गल्लीच्या तोंडा वरून, ओरडायचा, " डब्बेबाटलीय, नंतर सर्व मजल्या वर येई. आम्हा पोरांना दम देई. " बुक वाचली का, पाटी लिवली का अं, की घालू पोत्यात? आम्ही सर्व त्याला गल्लीत शिरताना पाहून, धडाधड पाटी पेन्सिल वही पुस्तकं घेऊन, ...
Comments
Post a Comment