समर्थ रामदास स्वामी कृत सोपी व सुकर अध्ययन पद्धती.
जय जय रघुवीर समर्थ ॥ समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक यातील अध्ययन पद्धत.
माझ्या जिज्ञासा असलेल्या जागृत रसिक वाचक हो,
पहिलाच श्लोक बघू
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ||1||
त्यांनी प्रथमच विद्यापती बुद्धीची देवता श्री गणेशाचे स्तवन केले आहे. तो सर्व गुणांचा ईश - देव आहे, असे सांगितलेय. तो सर्व कार्याचा मूळ स्वरूपी आरंभ आहे तो निर्गुण ही आहे. पुढे, ते असा उपदेश करतात की, शारदा म्हणजेच विद्या देवी ही जणू स्वयंभु,
"" चत्वार """ वाचा आहे. तेव्हा आपण सर्वांनी हा पंथाने मार्गाने गमन करू या. म्हणजेच याचे आचरण करू या. तर अध्ययन, हे योग्य मार्गाने होऊन, आपल्याला विद्या - ज्ञान प्राप्त होईल. चत्वार = चार प्रकार. हे चार प्रकार - अभ्यासाच्या चार पायऱ्या - सोपान.
1. परा. 2 पश्यन्ती. 3 मध्यमा. 4 वाणी -वाचा.
या द्वारे, आपण सहज अभ्यास करू शकतो.
बघा आता, आपण, जेव्हा पुस्तक उघडतो. समोर जे पान येते. (परा )त्यातील विषयाचा मनात विचार येतो. नंतर त्याकडे बघतो. ( पश्यन्ती ), मनात वाचन करतो. या नंतर तिसरी पायरी -- महत्वाचा (मध्यमा ) भाग म्हणजे, त्यावर मनन व चिंतन करणे. हे सर्व मनःपूर्वक केले, तर त्यानंतर वाणी चा उपयोग म्हणजे मनात किंवा मोठ्याने शब्दश: वाचन. ह्या पद्धतीने केलेला अभ्यास नक्कीच पक्का स्मरणात राहतो.
आता याच रीतीने आपण पुढचा श्लोक बघू या.
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥
हे मोठ्याने वाचन करण्यासाठी नाही, तर मनातच,आपल्या अंत:करणात म्हणायचे आहे, कारण ते आपण, आपल्याला मनाला समजून सांगायचे आहे..
तर ह्या चार ओळी कडे एकदा एकत्रित रित्या पहा. व नंतर वरील पद्धत वापरा. असे 2.3 वेळा करा. पुस्तक बाजूला करा. बघा, पाठ झालेच असणार.. तसेच इतर वाचन करून बघा. कशी आयडिया आहे?, अशाच प्रकारे, मुलांना अभ्यास करण्यास सांगा. हो, आणि यात भक्ती पंथ म्हणजे देव देव करणे नव्हे, तर आपण जे वाचन करत आहोत, ते पूर्ण भक्तीभावाने करणे, होय.
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.
Comments
Post a Comment