शिक्षक कसा असावा आणि कसा नसावा समर्थ रामदास स्वामी - दासबोध.

 शिक्षक कसा असावा आणि कसा नसावा. समर्थ रामदासस्वामी यांनी दासबोधात सांगितलेय.भाग 1.

 माझ्या सुबोध वाचक हो,

   शालेय जीवनातील काही शिक्षक आपल्याला, त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमुळे कायम आठवणीत राहतात. तसेच पुढील जीवनात ही indirectly प्रोत्साहित करतात. त्यापैकी आमच्या कामेरकर बाई. Oh, I mean सर्व दुनियेच्या, सुलभा देशपांडे. ते कौतुक नंतर सांगेन 

   पण तसेच, याच्या उलट काही शिक्षक... असो. No comments 

   आपण बघणार आहोत कि, गुरू नेमका कोठचा योग्य, पण समर्थ रामदास स्वामींनी , दासबोधात हेही सांगितलेय कि, गुरू कसा नसावा. बरेचदा कोठचीही गोष्ट कशी असावी, ह्याचे वर्णन करणे, विस्तृत होते. तरीही काही बाबी राहून जातात. तेव्हा सोपा मार्ग म्हणजे, त्या कशा नसाव्यात, हे ठरवले कि, scope नेटका व नेमका होतो. 

         हेच रामदास स्वामींनी दाखवून दिले आहे.  चांगल्या व भल्या माणसाचे गुणधर्म न सांगता, ते मूर्ख लक्षण- पढतमूर्ख- कुविद्या-  बध्दलक्षण- चंचळ लक्षण- करंटलक्षण यावर निरूपण करतात. हे करंट मराठी करंट ( क रं टा ) आहे बरे, english current नव्हे हं.  तसेच त्यांनी दासबोधाच्या ५व्या दशकात  १ल्या समासात, गुरू निश्चित कसा करावा, हे सांगितलेय. अन्  दुसर्‍या समासात गुरू लक्षण सांगितली आहेत, अर्थात् यात गुरू कसा नसावा, हे स्पष्ट केले आहे. 

         त्या सोप्या शब्दातील ओळीच बघु या.

         जे करामती दाखविती। 

         तेही गुरू म्हणिजेती। 

         परंतु ते गुरू नव्हेती।

         मोक्षदाते। ( नाहीत) ।।१।।

         सभामोहन मुररे चेटकें।

         साबरमंत्र कौटाले अनेके।

         नाना चमत्कार कौतुके।

         असंभाव्य सांगती  ।। २।।

         सांगती औषधप्रयोग।

         कां सुवर्णधातूचा मार्ग।

         दृष्टिबंधने लागवेगे।

         अभिलाषाचा  ।।३।।

 तीनशे वर्षांपूर्वी समर्थ्यांनी, जे सांगितले, ते आजही घडत आहे. अगदी डॉक्टर, इंजिनिअर सोने तयार करणे वा स्वस्त सोने मिळवण्यासाठी असल्या गुरूंच्या नादी लागतात व नंतर, पोलीसांकडे धाव घेतात. महिलांना दागिने पर्स मध्ये काढून ठेवा ( दृष्टीबंधन )

           आता एकदम समास २०वा.

          जें जें मन अंगिकारी ।

                तें तें स्वयें मुक्त करी ।

         तो गुरु नव्हे, भिकारी- ।

                   झडे आला ॥ २०॥ 

           जे शिक्षक विद्यार्थ्यांना, नेते- कार्यकर्त्यांना तसेच 

      ज्यांना गुरू मानले जाते, ते आपल्या भक्तांना,  कार्य करायला सांगतात, पण स्वतः मात्र तेच करण्यासाठी मागे पुढे करतात, ते गुरू नव्हेच.   भिकार लक्षणी होय.

         शिष्यास न लविती साधन (शिस्त)।

          न करविती इंद्रियेंदमन ।

        ऐसे गुरु आडक्याचे तीन । 

        मिळाले तरी त्यजावे ॥ २१॥

 जे आपल्या विद्यार्थी, वा चेल्याना शिस्त लावू शकत नाहीत, जे स्वतः संयम बाळगू शकत नाहीत. ते दूरच ठेवावेत. मुलांना रेल्वे लाईन क्रॉस करू नये, सांगतात पण स्वतः मात्र... ह्यात पालक वर्ग ही आला.

        जो कोणी ज्ञान बोधी । 

             समूळ अविद्या छेदी ।

        इंद्रियेंदमन प्रतिपादी ।

             तो सद्गुरु जाणावा ॥ २२॥

जे स्वतः प्रज्ञावान व जाणकार असतील आणि संयमशील असतील, तेच खरे व योग्य गुरू समजावे.

           ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू