आजची शिक्षण पद्धतीपरीक्षार्थी झालेय. तिथे विद्या + अर्थी मुले होणार कशी???

 परीक्षार्थी रीत. विद्यार्थी नव्हे.

 मतप्रिय, वाचक हो, हा पुढील भाग, कदाचित प्रत्येकाला मनापासून पटला, तरी आजच्या सद्य परिस्थितीत आचरणात आणणे, कोणाला ही शक्य नाही 🤣. कारण आपण आपली विचार शक्ती गहाण ठेवली आहे. पण त्यामुळे आपण,आपल्या मुलांवर अत्याचार करत आहोत. त्यांना विद्यार्थी न होऊन देता, परीक्षार्थी बनवत आहोत.

      "" तिची साडी वा दागिने माझ्या कडे का नाहीत?? अशाच धर्तीवर सतत आपल्या मुलांची, तुलना इतरांशी करून, मार्कांच्या, घोडदौडीत, त्यांची दमछाक करतो. 


          येक द्रव्याचे विकिले  (आजचे कोचिंग क्लासेस)

           येक शिष्याचे आखिले 

             (शिष्य सांगेल तेवढाच portion शिकविणे)

          अति दुराशेने केले।

   ( इतके 2.3 मार्क्स का गेले? )

          दीनरूप  (शिष्याला, बिचारा करणे )  ।।२३।।

         जें जें रुचे शिष्यामनीं ।

        तैसीच करी मनधरणी (मस्कापॉलिसी) ।

       ऐसी कामना पापिणी ।

        पडली गळां । २४॥

        जो गुरू भीडसारु ।

       तो अद्धर्माहून अद्धर्म थोरू ।

        चोरटा मंद पामरु ।

         द्रव्यभोंदु ॥ २५॥ 

( डोनेशन वा आरक्षण )

        जैसा वैद्य दुराचारी ।

         केली सर्वस्वें बोहरी ।

         आणी सेखीं भीड करी । 

          ( तो)  घातघेणा ॥ २६॥

                   ( घातकी )

         तैसा गुरु नसावा । 

         जेणें अंतर पडे देवा ।

   ( देव म्हणजे इथे यश दूर जाणे - मार्क मिळतात. पण पुढे मुलाखत - नंतर प्रत्यक्ष job मध्ये,काम जमत नाही.)

         भीड करूनियां, गोवा( गोंधळ)- । 

         घाली बंधनाचा ( कमी शिक्षण) ॥ २७॥ 

( फक्त प्रश्न पत्रिका सोडवून likely question पुरता च अभ्यास करून घेणे 

         हे महत्वाचे don'ts रामदास स्वामींनी आपल्या मार्गदर्शनासाठी सांगितले आहेत. ते तसे साध्या व सुबोध भाषेत आहेत. सहज कळण्यासारखे आहे नं?  पण लक्षात कोण घेतो? आमच्या वेळी,  ट्युशन लावू का? हा ""शिक्षे प्रमाणे ""धाक दाखविला जायचा. तसेच गाईड्स, "ढ " मुलांसाठी असत. यात बदल शिक्षणाचा व्यापार थांबवायचा , तर पालक वर्गातच जागृती हवी.

     ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू