कृष्ण लीला हवी - रास लिला नको.
कृष्णलीला हवी - रासलिला नको. परवा आपण श्रीराम व श्रीकृष्णाची एकरूपता पाहिली. तीच एकरूपता, त्यांच्या भक्तांत ही आहे. दुदैवाने आज फेसबुक वरील तथाकथित विद्वान (अर्थात् स्वघोषित) यांनी "भक्ति" या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे. त्यांच्या मते, I mean, त्यांना, ज्या व्यक्तीकडे बोट दाखवून, ह्यांच्यावर टिका करा, सांगून फेसबूक वर सोडले आहे. त्या व्यक्तिच्या, प्रत्यक्ष कार्याचे कौतुक करणारे, या विद्वांनांच्या मते, अंधभक्त असतात. शब्द ही असे वापरतात, अंडभक्त😀 असो. आपण चांगल्याला चांगलेच म्हणावं. हे माझे तत्व. अन् जे वाईट आहे, ते वर्षोन् वर्षे प्रचलित आहे, म्हणून , " वा! छान! म्हणून माना डोलवायच्या, हे होणे नाही. परवाच्या लेखा सोबत मी, माझा एक एपिसोड दिला आहे, तो आपण पाहिलाच असेल, असे मी मानते. नसल्यास, कृपया, बघा. कृष्णाच्या खर्या स्वरूपाला जाणा. त्यात मी आपल्याला, राधेची खरी ओळख करून दिली आहे. ती व तिचा पती, कन्हैयाचे खरे गाढे भक्त होते. ही त्यांची श्रध्दाच, त्यांना गोकुळातून पायी निघून सौराष्टात वाटचाल करण्यात सहाय्य...