इतिहासातील सत्य व लटके (काल्पनिक) दिखावे
इतिहासातील सत्य व लटके दिखावे. हो, वाचक वर्ग हो, मी आता जे लिहीणार आहे, त्यातून खरे व खोटे वेगळे करणार आहोत. कसे ते बघा. आणि आणखी एक आज पासून, लेख मोठा व महत्व पूर्ण असेल आधी ही असे. पण मला वाटते, जसा कालचा पेपरात किती ही महत्वाची बातमी वा लेख असला, तरी तो रद्दीच्या गठ्ठात, पडतो.. तसे माझ्या लेखाचे होऊ नये असो. तर वाचा बरे. शिवकाळात जे घडले ते सत्य मांडले आहे, पण त्याच बरोबर मिथ्य़ा( काल्पनिक कथा) पुढे आल्या. त्यामागे, सावत्र मातेचे, सोयराबाईंचे कटकारस्थान होते. स्वःपुत्राला राजा करावयाचे होते. ते एका विशिष्ट घटनेने सिध्द होते. जसे कैकयीचे कपट, भरताला अयोग्य भासले व त्याने रामाच्या पादुका ठेऊन, राज्य संभाळले. तोच कित्ता छ. राजारामाने गिरवला. ते सर्व आपण पाहाणार आहोतच. पण भविष्यकाळात ही, छ.शंभू राजेच्यावर आपल्याच महाराष्ट्र देशी अन्याय केला गेला. त्यांच्या शौर्याच्या कथा व त्याचे, औरंगजेबाने, केलेल्या क्रुर हालहालाच्या हत्येच्या, सत्य घटना, अभ्यासक्रमात नसो, पण निदान दृश्य स्वरूपात, तरूण- पौढांना दाखवायला ...