Posts

Showing posts from May, 2021

संस्कार धर्मरक्षणाचे व आपण करत असलेले धर्मकार्य.

 ३‍१ .५ .२१ संस्कार - धर्म संरक्षणाविषयी व आपण करीत असलेले धर्मकार्य.         हां. Do not take tension. I am not telling you to follow too much burdon and spend time in reading  ग्रंथ & पूजापाठ.          बघा. आता तेव्हा, या दोन्ही राजस्रियांनी, मातामह सकवारबाई व माता येसुबाई यांनी, बालराजेंना देव देव, पूजापाठ करून संकट दूर करण्याने परमेश्वराला  साकडे घालावयास सांगितले नाही. तर बालराजे, हे निश्चितच छत्रपती होणार व त्यासाठी, सर्व प्रकारे जय्यत तयार करवले. मग साहजिकच त्यांच्यात भावी काळाबद्दल आत्मविश्वास जागृत झाला. पण नुसतीच दिवास्वप्ने न बघता, आत्म निर्भर होण्याकडे, त्या बालजीवाने पाऊले उचलली. आजूबाजूच्या सामाजिक व मानसिक प्रदूषणाचा परिणाम होऊन, तिघांनी आपली हिम्मत हारली नाही. हे महत्वाचे आहे.             जरा त्या परिस्थितीवर नजर टाकू या. व आज आपण किती निवांत जगतोय, तरी  कधी कधी, पालक मुलांच्या बाबत, एखाद्या मार्कासाठी निराश होतात पण त्यावर विचार च आचार करून, ही निराशा मुलांच्यात inpla...

मस्त जीवन जगत असताना, आपण करीत असलेले धर्मकारण.

 २६.५ .२०२१ धर्मरक्षण आपल्या राज्ञीचे व आज आपली धर्मतत्परता.    स्वागत करते, आपण सर्व वाचक रसिकच नव्हे तर सजग आहात. धर्मजागृत आहात. छान वाटले. धर्मपरायण म्हणजे गंभीर boring life जगायचे, असे नाही, तर यात ही गंमत आहेच. तेव्हा आज इतिहासासोबत, वर्तमानावर ही नजर टाकू या. कारण आपण काही फक्त माहिती करून गपचिप बसणार नाहीत. तर सद्य परिस्थितीत त्याचा, आशय व उपाय बघणार आहोत. I mean follow करणार आहोत.    त्या खडतर परिस्थितीत, राज्ञी येसुबाईंनी, आपल्या पुत्रांवर, स्वधर्मप्रेम व स्वराज्यनिष्ठता बिंबवली. गुप्तता राखून, प्रशिक्षित केले. स्वतः व राजमाता सकवारबाईंची व्रत वैकल्ये संभाळली. त्यातून शके महिने व ऋतु व तिथी - सणवार  यांचे सखोल ज्ञान, बालशाहूंना करवले. भावी छत्रपती या नात्याने, असलेला धर्म= धृ धारयते  इति धर्म. म्हणजे आपली समाजाशी बांधिलकी व आपण जे काही आहोत, त्या प्रमाणे आपले कर्तव्य. राजा असो- अधिकारी असो.- सेवक असो वा बाल- तरूण- पौढ - वृध्द. सर्वांचे एक विशिष्ट कर्तृत्व   विधीलिखित असते. त्याप्रमाणे वर्तन.       आता थोडे म्हटले...

छत्रपतींच्यावरील छावणीत मातेने जे संस्कार केले, त्यातूनच घडले, सुप्रशासक छत्रपती.

 बालशाहूं राजाचे छावणीतील दुहेरी जीवन. सुस्वागतम्, माझ्या सुजाण वाचक हो, अगदी मनपूर्वक. मी आज खूप खुश आहे. ह्या ब्लॉग लेखनाचा, मी प्रारंभ केला तर खरा. पण जरा मनात संदेह होता. आजकालच्या दुनियेत,  ऐतिहासिक अशा  सुवर्ण अक्षरात नोंद घ्यावी, अशा महाराज्ञीची गंभीर दखल कोणी घेईल का?  prank& jokes च्या, या दुनियेत मी वेडी तर ठरणार नाही नं? पण नाही. तुम्ही  mature & intellgent लोकांनी मला आनंदाचा व आश्चर्याचा धक्का दिलात. दिवसाला १०० हून जास्त जनता, हे जाणून घेण्यास उत्सुक आहे, पाहून माझा  उत्साह द्विगुणित झालाय. मी हे ४च दिवस न लिहिता दर रोज लेखन चालू ठेवणार आहे. तर भेटा व माहित करून घ्या, या दोघा सासुसूनेची( महामाता सकवारबाई व राज्ञी येसूबाईंची) महती. गनिमांच्या छावणीत, बालराजेंना घडवायची युगत.   छावणीतील जीवन. लहानग्या बालराजेंना घेउन माता व आजींचे मोगल छावणीतील जीवनाला आरंभ.  सुरूवातच झाली, ती नाव बदलण्याने. पण परस्वाधीन असलेल्या येसुबाईंनी _, ह्यातच समाधान मानले कि, औरंगजेबाच्या मुलीने, बेगम झिन्नतनुसाबेगम यांनी, संरक्षण व धर्म रक्षणाची ज...

छावणीतील सत्य व भविष्य.

 23.5.2021 बालशिवाजीराजे, " शाहू" बनले व  त्यांचे छावणीतील जीवन, कसे व्यतित झाले.      बादशहाची छावणी. मजल दरमजल करीत, सरदार झुल्फिकारखान,  राजकैद्यांना घेऊन डेरे दाखल झाले.          छावणीत शिरल्यावर, मातोश्री सकवारबाईसाहेबा व राज्ञी येसुबाईंना धक्काच बसला.  मोगल शिपाईंच्या सोबत जवळजवळ, त्याच संख्येने, आपली मराठी मंडळी ही दिमाखाने वावरत होते.  राजे तर लहान होते. पण येसुबाई तर जाणत्या होत्या. त्यांच्या लगेच मनात आले. ही तर उघड छावणी अाहे. इथे तर काही बंदिस्त चालत नसावे. म्हणजे~ मग  जेव्हा, स्वारींच्या बाबत ते ते वध झाला-- धर्म बदलण्यासाठी, त्यांचे व कवि कलशांचे हाल हाल केले गेले, ते ह्या सर्वांच्या उपस्थितीतच घडले असावे तर-- मग परक्या कलशांनी  आपले डोळे फोडले- जीभ कापली तरी स्वामींची साथ सोडली नाही.~ पण हे सर्व स्वकिय बघत बसले असतील का? फक्त वतनासाठीच का?  स्वहितासाठी स्वधर्म - आपले राजे- ह्यांच्यासाठी, " प्राण घेतले हाती",  ते मावळे हेच का? जर हे आता इथे असलेले व मराठी  जन्म घेतलेले, त्या वेळी एकत्...

छ.संभाजी कृत , " संस्कृत ग्रंथ बुधभूषण" यातील सुचक मदत.

 22. 5 . 2021. छत्रपती शाहू यांचे मोगल छावणीतील वास्तव्य व त्यातील वास्तव.         Good morning Viewers, Welcome.       आज आपण महाराज्ञी येसूबाईं व बाल शिवाजी (शाहू) राजे व इतर राजपरिवाराच्या, मोगल अधिपत्याखालील व्यतित झालेल्या, तब्बल १९ वर्षाचा (१६८९ ते १७०८)  या  कालावधीचा आढावा घेणार आहोत. मी मुद्दाम अटक व कैद शब्द वापरले नाहीत.  का तोच खुलासा करणार आहे.         अगम्य व अजिंक्य असा रायगड, फितुरीमुळे, मोगलांचा अधीन होऊ घातला होता. आधीच स्वकियांच्या, खुद्द येसुबाईंच्या सख्या भावाच्या दगलबाजीमुळे छत्रपतींचा संभाजीराजेंचा मृत्यु झाला होता. सद्यकाळात आपले कोण - फितुर कोण कळेनासे झाले होते. येसुबाईंनी चाणक्यनीतिचे अध्ययन केले होते. त्याचा उपयोग केला. औरंगजेबाच्या सरदाराला, झुल्फिकारखानाला संदेश पाठवला, " आम्ही रायगड  देऊन स्वत: स्वाधीन व्हायला तयार आहोत. पण अटीवर, आमच्या जीवाची व धर्मरक्षणाची हमी, त्याने घ्यावी. त्या अाधी त्यांनी राजारामांची, गुप्ततेने गडावरून रवानगी केली. व मोजक्या विश्वासू मंडळींची सभा घेऊन अ...

छत्रपती संभाजी महाराज पुत्र - छत्रपती शाहू ( सातारा) महाराजांचे बालपण.

 २०.५ .२०२१ . छत्रपती संभाजी पुत्र छ. शाहू महाराज बालपण. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म व बालपण. त्यांचा जन्म १८ मे १६८२ रोजी गांगवली येथे झाला. त्यावेळी छ. संभाजी राजे रामसेज किल्लाच्या रक्षणाच्या कामी होते. पुत्रजन्माच्या वेळी ते रायगडी परतले. व गांगवली येथे आले. बालराजेंचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीसाठी , "शिवाजी" असे केले.           नंतर लवकरच  संभाजी राजेंनी १० जुलै  १६८३ रोजी महाराज्ञी येसुबाईंचा  व चिमुकल्या शिवाजीराजेंचा  निरोप घेतला व ते राजापूरला  गेले. तेथून गोव्याला रवाना झाले.तेथे विरजईचा हिंदुवरील अत्याचाराचा अतिरेक झाला होता. त्यांनतंर ते १६८३ नंतर रायगडी परतले.  पण लढाईची धामधूम व फितुरीचे  भिरभिरणारे संकट यामुळे  बालराजेंना  पितृसंगत मिळालीच नाही. अन् बालराजेंच्या वयाच्या ८व्या वर्षीत तर छ.शंभूराजेंचा वध झाला. परंतु  कर्तव्यदक्ष माता येसुबाईंच्या च आजी सकवारबाईंच्या देखरेखी खाली त्यांचे जीवन सुखात व राजेशाही पण शिस्तीत व्यतित होत होते.  त्याच बरोबर अनेक जणांच्या फितुरी...

१८मे.आज सातारा छ.शाहू महाराजांचा जन्मदिवस १६८२.

 छत्रपती शाहू सातारा गादीचे संस्थापक.       हो. आज ह्या सर्वात जास्त कालावधिचे सुप्रशासक असे छत्रपती. आज त्यांचा जन्मदिवस. १८ मे १६८२. पण खरेतर, निदान खुद्द सातार्‍यात हा दिवस शाही स्वरूपात साजरा व्हायला हवा होता. असो. छत्रपती संभाजी महाराज व महाराज्ञी येसूबाईंचे सुपुत्र.  भावी छत्रपती असल्याने, ह्यांचे बालपण, शाही स्वरूपात पण शिस्तीत रायगडी  गेले. पण वयाच्या अवघ्या ७ व्या  वर्षीच नियतीची चक्रे अशी फिरली कि, सगळे होत्याचे नव्हते झाले. औरंगजेबास फितुर झालेल्या, छ.संभाजीच्या मेव्हण्यांमुळे, ते यवनाच्या हाती पडले. खरे तर जावळीच्या घनदाट जंगलात संगमेश्वरी, मुगल सैन्याला, छ.शंभुराजे सापडणे, शक्यच नव्हते. पण दोन्हीकडून मेव्हणा (महाराज्ञी येसूबाईंचे बंधू व छ.शिवाजी महाराजांची सुपुत्री राजकुँवर, ह्या भगिनीचे पती, गणोजी शिर्के, ह्यांनी वतनापायी, दगलबाजी केली. व छ.शंभुराजेंचा ठावठिकाणा,मोगलांना दाखविला. त्यांच्या वधानंतर, रायगड पडला. अन् राजपरिवार औरगंजेबाच्या हाती लागला. भावी छत्रपती जन्मतः नाव शिवाजी, आपल्या मातोश्री येसुबाई व आजी सकवारबाई ( छ.शिवाजी महार...

सुखी जीवनातील मोठा अडसर- अहंमन्यता.

 १६ मे २०२१. नटसम्राट. वि.वा. शिरवाडकर.  १९७० साली प्रथम हे नाटक आले. या नाटकातून वि.वा. नं ( कुसुमाग्रजांना) नेमका  काय संदेश द्यावयाचा होता, ते तेच जाणे. पण तेव्हापासून तमाम श्रोते, अप्पा बेलवलकर, या नटसम्राटांसाठी, भावूक झाले, ते आजगायत. पण कोणीही त्या मुलांची ही  "काही" बाजू असेल, हा विचार केलाच नाही.  समजा, आपल्यातील वृध्द पालक, बाहेरून भजी वगैरे आणून कागदातच खाऊ लागले तर  घरातील मुलांची प्रतिक्रिया काय असेल?  एक उदाहरण मी पूर्वीच ह्या ब्लॉगमधून दिले आहे. परत सांगते. आम्ही तिघी मैत्रिणी ( मी, निलम देसाई व मीना शहा.) ऑफिसमधून परत येण्यासाठी दादरला ट्रेन पकडत असू. रोज एक वृध्द महिला, प्रवासी महिलांकडे पैसे मागे. तिच्या वयाकडे पाहून नवनवीन target मिळत असे. आम्ही लक्ष ठेवले. तर ती स्टॉलवर बटाटेवडे व गुलाबजाम खात असे. निघून जाई. देसाई म्हणाली, साडी चपला महागाच्या दिसतात..मीनाच्या पुढाकाराने, घराचा शोध घेतल्यावर लक्षात आले, मधुमेह ४५०च्या वर असल्याने पथ्य चालू होते. डॉक्टर मुला सुनेला दोष देत होते. देवळाच्या नावावर, ह्या महिलेचा गर्व- अहंकारच ना हा....

जीवनातील मार्गदर्शक. कुसुमाग्रज.

Image
 १५ मे २०२१. जीवनातील मार्गदर्शक - कुसुमाग्रज. पाचोळा. कविता.   आता मी हेच आध्यत्मिक अधिष्ठान, सगळ्यांच्या जीवनात असतेच असते. हे सिध्द करणार अाहे. कदाचित, तुम्हाला, त्याची जाणिव नसेल. कसे ते सांगते.  मराठी लोकांमध्ये,  "कुसुमाग्रजांना न ओळखणारे, व्यक्ती विरळाच. खरे तर अजिबात नाही बोलणे, मला आवडले असते. पण आज कित्येक मंडळी शालेय जीवनात शिकलेले धडे, कविता, म्हणी, वाक्यप्रचार व खास शब्द विसरलेत. Rather, in those days, most of the students, have not taken,, " THAT PORTION SERIOUSLY.. निबंध कविता--अर्थ  व रसग्रहण वगैरे, गाईडवरून. फक्त % वाढविण्यासाठी. असो.   तर आता सध्याच्या जीवनात, सोप्या रितीने, सुखी जीवनाचा मंत्र, मी ह्या ब्लॉकद्वारा देण्याचे १५ जानेवारी २०२० पासून कबूल केलेय. अन् शब्द पाळला आहे. ह्याच लिंक वर तेव्हापासूनचे लेख वाचू शकाल,  मग पटेल व सुखीसमाधानी जीवन सहज लाभेल. बघाच. मागे जाऊन लेख परत परत वाचा. अन् प्रत्यय येईल.     चला. आता जो, समर्थांनी मनाच्या श्लोकांत, जेष्ठ नागरिकांना उपदेश केला आहे, तोच कुसुमाग्रजांनी' रूपकात्मक व मनो...

कृष्णलिला हवी. रासलीला नको.

Image
 १३ .५ .२१ . कृष्णलीला हवी - रासलिला नको.    परवा आपण श्रीराम व श्रीकृष्णाची एकरूपता पाहिली. तीच एकरूपता, त्यांच्या भक्तांत ही आहे.  दुदैवाने आज फेसबुक वरील तथाकथित विद्वान (अर्थात् स्वघोषित) यांनी "भक्ति" या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे.  त्यांच्या मते, I mean,  त्यांना, ज्या व्यक्तीकडे बोट दाखवून, ह्यांच्यावर टिका करा, सांगून फेसबूक वर सोडले आहे.  त्या व्यक्तिच्या,  प्रत्यक्ष कार्याचे कौतुक करणारे, या विद्वांनांच्या मते, अंधभक्त असतात. शब्द ही असे वापरतात, अंडभक्त😀 असो. आपण चांगल्याला चांगलेच म्हणावं. हे माझे तत्व. अन् जे वाईट आहे, ते वर्षोन् वर्षे प्रचलित आहे, म्हणून , " वा! छान! म्हणून माना डोलवायच्या, हे होणे नाही. परवाच्या लेखा सोबत मी, माझा एक एपिसोड दिला आहे, तो आपण पाहिलाच असेल, असे मी मानते. नसल्यास, कृपया, बघा.  कृष्णाच्या खर्‍या स्वरूपाला जाणा.  त्यात मी आपल्याला, राधेची खरी ओळख करून दिली आहे.  ती व तिचा पती, कन्हैयाचे खरे गाढे भक्त होते. ही त्यांची श्रध्दाच, त्यांना गोकुळातून पायी निघून  सौराष्टात  वाटचाल कर...

श्रीराम व श्रीकृष्ण एकरूपता.

Image
 ११ मे २०२१ रामकृष्ण एकरूपता.     शनिवारी व रविवारी आपण त्या अद् भूत ग्रंथात, राम व कृष्ण याच्या चरित्राची सरळ लेखनात व विलोम लेखनात एकरूपता पाहिली.  प्रत्यक्षात त्यांच्या भूमिकेतील समानता पाहू. वरवर पाहता, अगदी विरोधी  आचरणातून त्या दोन्ही अवतारातून श्री विष्णूंनी एकच पाठ- आदर्श घालून दिला आहे. स्त्रीविषयक सन्मान. झालेय काय, संस्कृत ग्रंथांचे खोलवर अध्ययन, दाक्षिणात्यांनी केले, तितके आपण केले नाही. उत्तरेला तर श्रीकृष्णाला, आपल्या रसिकतेखातर, वेगळ्याच स्वरूपात, प्रदर्शित केले. आता या दोन्ही रूपात नारायणांनी,  महिलांना, माय भवानी कसे  मानले आहे, ते सांगण्याचा, मी प्रयास करत आहे.      आज जे काही चालले आहे, आपल्या, हिंदुधर्माच्या विरोधात, "गदारोळ" माजविला आहे, तो ही  हिंदुधर्मियांच्या पोटीच जन्माला, आलेल्या,  पुत्रांकडून. फेसबुकच्या माध्यमातून.              श्रीरामांवर, आरोप केला जातो, त्यांनी धोब्याचे ऐकून, पत्नीला सोडले. ह्याच मुद्दावरून, ही मंडळी, आपले मानमनिय मोदींजींची खिल्ली उडवतात. पण हे ...

२)राम नावातील गंमत. हिंदू धर्मातील ग्रंथात ही आहे रंजकता.९.५ .२१ दुसरा भाग.

 या ग्रंथाचे नाव ही , " राघवयादवीयम्" ठेवले आहे.  राघव हे श्रीरामाचे प्रथम नाव व पुढे लावलेय, श्रीकृष्णाचे कुलाचे नाव. दाखवलेय, दोघांची,  "एकरूपता". दिसतेय या कवि वेंकटाध्वरिंची आत्मिक क्षमता. अर्थात त्यासाठी त्यांनी किति वाचन केले असेल, अनेक शब्दसंपदेचे, " राजस्व मनात जमा केले असेल व ह्या अकल्पित  साहित्याची निर्मिती केली असेल. या तिन्हीचा संदर्भ,माझ्या आधीच्या दोन लेखात मिळेल.    पहिला श्लोक,          वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।          रामो रामाधीराप्यागो लिलामारायोध्ये वासे ।। १।।       हेच उलट क्रमाने लिहिल्यास,         सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः ।         यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ।।१ वि.।।           बघा नीट अक्षर रचना. असे ३० श्लोक अर्थ पूर्ण , हेही आपल्या हिंदू धर्मातील सर्व भारतवर्षात वंदनिय असलेल्या राम व कृष्ण दोन्ही देवतांचे एकत्रित गुंफलेले  चरित्र. त्...

१)राम नावातील गंमत. हिंदू धर्मातील ग्रंथात ही आहे रंजकता.८.५ .२१ पहिला भाग.

 वाचक हो,   तुमचे स्वागत आहे. हां. कदाचित तुमच्या मनात येईल, नेहमीच काय , " राम", पण हे वाचाल तर लाखो कमवाल, अर्थ (पैसा) या अर्थाने नव्हे तर ज्ञान या अर्थाने. संस्कृत कडे आपले तसे दुर्लक्षच झालेय. मृत भाषा मानली आपण, शेकडो वर्षे. त्यामुळे आज आपण खूप मोठ्या खजिन्याला मुकलो आहोत. अजून वेळ गेली नाही.       मी आज एका महान ग्रंथाची ओळख करून देणार आहे. हा ग्रंथ छोटा म्हणजे ३० श्लोकांचा आहे. पण गंमत म्हणजे तो वेगळ्या प्रकारे वाचल्यास ३०+ ३०= ६० श्लोकांचा होतो. आता बघा,   हा ग्रंथ माझ्या बालमैत्रिणीने whatsup केला.  सौ. शुभांगिनी चंद्रकांत जाधव. (मूळ सुनंदा गोपिनाथ गुप्ते) जन्मापासून मैत्रिणी. खांडके चाळ नं ५.      मूळ  हा ग्रंथ कोणी शोधला व  whatsup मध्ये प्रसारित केला, ते रामकृष्णच जाणे. . त्या ग्रंथकर्त्यासोबतच, ह्या शोधकर्त्याला प्रथम नमन करू या.  आता बघा हा नमन शब्द दोन्हीकडून ही वाचा. सेम. तसेच बघा देव अक्षरे उलट केली अन् मात्रा जागीच ठेवली, तरी दोन्ही पूजनियच देव व वेद.   तशीच गंमत या ग्रंथात आहे. प्रत्य...

एकरूपता संचित व क्षमता. हेच रामस्वरूो.| 07/05/2021

स्वागत, रसिक हो. मीही तुम्हाला भेटायला उत्सुक असते, सदैव.        काल परवा आपण "राम" या नावाचा संदर्भ व  संस्कार कसा होऊ शकतो. ते पाहत होतो. आज ही " राम" ही संकल्पना वेगळ्या स्वरूपात व संदर्भात जाणून घेणार आहोत. धर्म म्हणजे काय, ते मी वेळोवेळी सांगत आहे. आपल्या आजुबाजूच्या संपर्कातील व्यक्तींच्या बाबत आपले कर्तव्य म्हणजे आपला धर्म. काही जण, " हिंसा करणे" हाच आपला धर्म मानत आहे. आज जे काही बंगालमध्ये घडत आहे, ते घडवणार्‍या घटकांना, तसेच घडवले आहे. मारावे हेच इति कर्तव्य, हा कुसंस्कार झाल्याने, ते इतिहास घडवत आहेत. असो. मी काही या बाबत बोलणार नाही. प्रत्येकाने या वर विचार करावा. वा मला काय, त्याचे असे मानावे. फक्त यामुळे आपल्या मुलाबाळांना, नातवंडा-पतवंडांना कसे जीवन जगायला, मिळणार आहे, त्याची just कल्पना करावी.       आता बघा. आपण पितृपक्ष फालतू ठरवतोय. पण ती एक पूर्वजांना. देण्यात येणारी Thank giving  आहे. आपण त्याला मुकणार आहोत. आजच्या नातवांच्या मुलांच्या खिजगणतीत आपण नसणार. पण  शाळाशाळातून हॉलोविन साजरा केला जात आहे. जाणार आहे. ते ...

03 .05 .21 . राम = राजस्व मनाचे Part 2.

राजघराण्यात जन्मलेल्या प्रथम सुपुत्राचे नाव ठेवताना, त्याकाळी मातापित्याने, हा विचार करूनच हे,  "राम" हे नाव ठेवले असणार ना? तर हे दोन अर्थ मी सांगितले  आहेत. पटले तर, राम (आत्म क्षमता) वा राम ( राजस्व मनातील- सुविचारांची साठवण) हे विधान लक्षात घ्या.         आज अनेक दिवसांच्या gap नंतर एवढेच. पण खरे तर आभाळायेवढे ज्ञान. Actually, for meaning of RAM -the sky is the limit. The sky is the unending SPACE.   तर भेटू या पुन्हा पुन्हा. सध्या रविवार.मंगळवार. गुरूवार व शनिवार. चला तर या भेट द्या. माझ्या ब्लॉगला, ठरलेल्या दिवशी.          once again, I apologize for so long interval. Now onwards regularly. मिलेंगे, परसो मंगळवारी see you soon. like & subscribe करोगें नं!

02 .05 .21 . राम = राजस्व मनाचे.

 राम = राजस्व मनाचे.   रामनवमी तर झाली _, २२ एप्रिलला, आज परत काय असे म्हणतील, काही वाचक. पण मला ओळखणारे व समजणारे मूळ वाचक निश्चित अंदाज करतील कि,   there is something special  in my mind. and  eagerly start reading. या वाचकांच्या दृष्टीकोनाची, मी खात्रीशीररित्या पुर्तता करीनच करीन. अन् तुम्ही परत परत माझ्या या ब्लॉगमध्ये याल अशी खात्री बाळगते.     आज रामनवमी नंतरचा बारावा दिवस. पुराण काळापासून "बारसे" हे  बाराव्या दिवशी साजरे केले जाते. तेव्हा दशरथ व कौसल्या पुत्राचे नामकरण ही असेच साजरे केले असणार. तेव्हा या,"राम" नावाचे गुपित जाणून घेऊ या.    सुस्वागतम् । या माझ्या BLOG मध्ये.   राजस्व म्हणजे राज्याची आय. येणारी funding. करस्वरूपी जमा होणारी संपत्ती.  आता राम म्हणजे आपल्या मनात जमा होणारे, सुविचार ( फळ्यावरील वा  शालेय जीवनात फक्त,  वहीत लिहून रद्दीत गेलेल नव्हे, तर) जीवनात पदोपदी आचरणात आणलेले  सुविचार व संस्कार. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जूना मराठी सिनेमा," छडी लागे छमछम. एका शाळेतील श...