आदर्श असा लोकमान्यांच्या मनात असलेला गणेशोत्सव.
आदर्श असा लोकमान्यांच्या मनात असलेला गणेशोत्सव. माझ्या उत्सव प्रिय वाचक मंडळीनो, 20 तारखेचा लेख वाचलात नं, तर त्यावर मनन ही करा. आता आणखी, एका आदर्श, गणेश मंडळाची, ओळख करून देणार आहे. गंमत म्हणजे हे मंडळ ही तरुण मुले च चालवतात हं. मी तेथेच कनाशीला असतानाची गोष्ट. मी याआधीच लिहिले होते. हे सर्व आश्रम, वि हिं प,, रा.से सं. जन संघ, जनकल्याण समिती व. क. आ., यातील महिला, सेवावर्ती होऊन चालवतात. त्यांना, सर्व, तरतूद, आपणच करायची, हे माहीत असते. मला हे नवीन होते. असो. तर आश्रमाच्या कोठीत, साधारण आठवड्यासाठी, शिधा शिल्लक होता. तेव्हा कळवणवरून, सौ. मंजुश्री मालखरे आल्या, मला, काही अडचण आहे का, विचारायला. मी खरे सांगितले. माझा नवखेपणा, त्यांच्या लक्षात आला. त्या बोलल्या, " काकू मी बघते व सांगते". त्यांनी घरी जाऊन, आपल्या मुलाला, योगेशला सांगितले, तो कळवण गणेश मंडळाचा सदस्य होता. त्याने लगेच मिटिंग घेतली व ठराव मांडला. आणि त्या सर्वांनी, एकमुखाने निर्णय घेतला. वर्गणी मागतान...