म्हणी.आपल्या गुरू.आता आणखी म्हणी बघू काय शिकवत्यात बरे.
२९.१२ .२०२३ .म्हणी. आपल्या गुरू. आता आणखी म्हणी बघू काय शिकवत्यात बरे. १३.अति परिचयात् अवज्ञा – कोणाच्या घरी जास्त जाऊ नये. तसेच इतरांच्या बाबीत, जास्त तोंड खूपसू नये वा उगीच सल्ला देऊ नये. जवळीकता असली तरी मर्यादा राखून राहावे. म्हणजेच कोणाची privacy भंग झाल्यास अपमान होऊ शकतो . १४.अति झाले अन् हसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला , की ते हास्यास्पद ठरते. ( एकूण कोठचीही limit cross करू नये.) १५ .अति झाले अन् आसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला , की ती दुःखच होऊ शकते. १६.अंगावरचे लेणे , जन्मभर देणे – दुसर्याचे दागिने बघून हव्यासापोटी, आपणही,दागिन्याकरिता कर्ज काढावयाचे अन् ते लेणे मिरवायचे आणि ते रिण, जन्मभर फेडीत बसायचे . १७.अंधारात केले , पण उजेडात आले – एखादी गोष्ट कितीही गुपचुप केली तरी ती काही दिवसांनी सर्वांना कळतेच.तेव्हा beware while active. १८. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपली आर्थिक परिस्थिती पाहूनच खर्च करावे. १६ व्या म्हणी नुसार, इतरांना दाखवण्यासाठी खरेदी करू नये. १९. नाचता येईना, अ...