सभ्यता व संस्कार कोठे मिळतेय का बाजारी?सुसंस्कार ही पालकांची जबाबदारी, होय.
२९ .२ .२०२४ . सभ्यता कोठे मिळतेय का बाजारी? सुसंस्कार ही पालकांचीच जबाबदारी. होय. व माझ्या सुसंस्कारी व समंजस वाचक हो, माझ्या लिखाणाला- माझ्या सामाजिक हाकेला, मनपूर्वक, प्रतिसाद देत आहात. मी आज फार पूर्वीचा लेख (२१.९ .२१ चा लेख पुनर्प्रसारीत करीत आहे. मी काही बाबतीत, आदिवासींच्या श्रध्देचा, अनेक वेळा आदरयुक्त उल्लेख केला होता, आठवतोय. इथे शहरवासीय, स्वतःला सामाजिक रित्या सुशिक्षित मानतात. अन् या डहाणूच्या आदिवासींना अडाणी. अर्थात् मदतीचा हात पुढे करतात. आम्ही पूर्वी व.क.आ. च्या माध्यमातून, तेथे जात असू. मोजकेच खरे कार्यकर्ते. पण दिवाळीला खूप लोक येत खाऊ वाटपासाठी. तुम्हाला ऐकून माहित असेल,आदिवासी महिला फक्त साडी नेसतात. चोळी- पोलके नसते. तर त्यावेळी आमच्यापैकी एका महिलेने, त्यांच्यातील,बाळाला अंगावर पाजत बसलेल्या आदिवासी बाईंला, याबाबत सल्ला दिला, त्या बोलल्या, " अग, पुरूष माणसे वाईट नजरेने बघतात." ती जरा नवलाने बघू लागली. अन् त्यांच्यातील, जवळच बसलेले, वयस्क गृहस्थ काय म्हणाले म...