मोर्चा कार्यकर्ता व झेंडा.
मोर्चा, कार्यकर्ता व झेंडा. माझ्या सुजाण व सावध वाचक हो, घाबरू नका, मी काही राजकारणावर लिहिणार नाहीये,माझा मूळ हेतू व जागरण, समाजकारण हेच आहे. मी पूर्णतः त्या संबंधीच लिहिते व लिहिणार आहे. प्रथम मी एक माझ्या आयुष्यातील किस्सा सांगते. मी व माझी मैत्रिण नलिनी आरेकर, मालाडला, "रामलीला प्रचार समितीच्या जागेत, गरजू मुलांसाठी अभ्यास वर्ग सुरू केला, मुले खुशीने येत, अभ्यास मनापासून करीत., जवळपासच्या पाच शाळेतील मुले येत. त्या शाळातून ही त्यांच्या प्रगती बद्दल, आमचे कौतुक झाले. मुलांची संख्या वाढत होती. पहिली ते कॉलेज सर्व मुले येऊ लागली. आणि अचानक एक दिवस फक्त सहावी पर्यंतचीच, मुले हजर, वरच्या वर्गातील मुले मुली गायब. आम्ही दोघी चक्रावलो. चौकशी केली, छोटी मुले सांगू लागली. सर्व वडापावाचा, झेंडा धरायला गेलेत. अरे देवा, म्हणजे मोर्चाला. एक धिटूकली,"आणि. मॅडम, पैसे बी भेटतात.", या निष्पाप पोरांना, मोर्चाचा हेतू माहीत नाही. शिवाय आणखी एक बाब कळली. बहुतेक मुलांना, त्यांचे वडील बरोबर घेऊन जातात. पैसे, बापाकडे, संध्याकाळ स...