नवीन जन सुरक्षा कायदा, योग्यच आणि आपल्या सुरक्षते साठीच आहे.
नवीन कायदा, ज्याला विरोध करणे, लोकशाहीची गळचेपी म्हणणे, अयोग्यच प्रिय वाचक हो, मी माझ्या तत्वाला धरूनच आहे. राजकारण हा माझा विषय नव्हेच. पण समाजकारण ही माझी, " मर्म बंधातली ठेव ", निश्चितच आहे. ज्यायोगे सामाजिकरित्या, एकतेला धक्का बसू शकत असेल, तिथे मी नक्कीच बोलणार. जनसुरक्षा कायदा योग्यच आहे. असे आहे की, अभिव्यक्त होण्याचा अधिकार सर्व नागरिकांना असला, तरी त्यासाठी, प्रत्येकाने तारतम्य बाळगणे, आवश्यक आहे. Social media वर जो तो, इतरांना नावे ठेवताना, स्वतः ला सुप्रीम कोर्टाचा जज्ज समजून लिहीत असतो, बघा, चिल्लर मुले ही फेसबुकवर काही ही खरडतात. जणू ते सर्व गुण संपन्न आहेत. सरकारला नावे ठेवण्यात नंबर वन. जेव्हा ही मंडळी, रस्त्यावरील खड्ड्यावर सरकारला नावे, ठेवतात, तेव्हा या अज्ञानी जणांची कीव करावीसी वाटते. मुंबई शहरातील रस्ते महानगर पालिकेच्या, अख्यतारीत येतात. त्यांचे दुरुस्तीकरण, म्युनिसिपालिटी, contract देऊन करत असते, आणि आज कित्येक वर्षे ह्यावर कोणाची सत्ता आहे, बरे?? ...