सायबर गुन्हगारांच्या विविध गुन्हेपध्दती
प्रिय वाचक मंडळी, आपण सावध रहावे, या साठी अनेक रित्या, मी सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन कृप्त्या, तुमच्या समोर आणत आहे. ते सर्व बुध्दीमान आहेत. त्यांच्या प्रज्ञेला वेळीच मार्ग व योग्य यश न मिळाल्याने, ते वाकड्या मार्गाला, लिलया, आपलेसे करीत आहेत. अाजच्या technology ची समग्र माहीती करून घेऊन, त्यायोगे, स्वतःला intelligent समजणार्या, so called , बहुदा, जेष्ट व श्रेष्ट(?) नागरिकांना , " उल्लू" बनवत आहेत. शुक्र २७ ऑक्टो च्या महा. टाईम्स मधील ही बातमी बघा. आजकाल एक fad झालेय. , आम्ही काही पेपर घेत नाही. काय करायच्यात बातम्या. पण जरा दुनियेची जाणिव होते. असो. " वृध्द दाम्पत्याची चार कोटीची फसवणूक." थोडक्यात घडले असे कि, दक्षिण मुंबईतील, एका महिलेला, अनोळखी व्यक्तीने फोन केला व मी पीएफ कार्यालयातून बोलतोय, सांगितले, खात्री न करताच, त्याच्या सुचना follow केल्या गेल्या. तो म्हणे, तुमच्या पतीच्या, पूर्वीच्या मालकाने, PF a/c मध्ये चार लाख गुंतवले, असून २० वर्षाने, त्याचे १२ कोटी मिळणार आहेत. पण त्याने ...