Posts

Showing posts from January, 2024

१८ पुराणे. आपल्या हिंदूच्याधर्मग्रंथापैकी एक महत्वाचा स्त्रोत.

 ३०.१ .२०२४ .१८ पुराणे. आपल्या हिंदूच्या धर्मग्रंथापैकी महत्वाचा ज्ञानस्त्रोत.    माझ्या प्रिय वाचक वर्ग हो, तुम्ही असेच अध्ययन प्रिय रहा. मी आज अगदी थोडक्यातच या १८ पुराणांची  माहिती देणार आहे. ही खरे तर, मनोरंजकात्मक आहे. तुम्ही कल्पना ही केली नसेल. इतकी मजेशीर व नवलपरी माहिती ह्यात आहे.    ह्या १८ पुराणांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.          १. ब्रह्म पुराण.            २. पद्मपुराण.            ३. विष्णु पुराण.              ४. वायु पुराण.             ५. भागवत पुराण.            ६. नारद पुराण.               ७. मार्कण्डेय पुराण.            ८.अग्नि पुराण.            ९. भविष्य पुराण.         १०. ब्रह्म वैवर्त पुराण.         ११. लिंग पुराण...

आपले ग्रंथ महत्वाचे आहेतच.पण कळावयास कठीण, असे मानले जातात. पण ते अगदी सोपे आहेत

Image
 २९.१ .२०२४.आपले ग्रंथ महत्वाचे आहेतच. पण ते जरा कळायला कठीण, असे मानले जाते. पण ते अगदी सोपे आहेत.      माझ्या सुजाण वाचक हो, सर्वसाधारण, असा समज आहे कि, ग्रंथ म्हणजे, बाप रे! कोण त्यात  डोेके घालणार?  ठीक आहे. मग मनोरंजक असे, युट्युब वरील वेचक प्रोग्रॅम बघा. जे crime patrol मधील काही episide मनोरंजनासोबत काही शिकवण व सावधगिरी सांगत असतात. त्यांची सुरुवातच बघा. त्यात crime patrol या शब्दाबरोबर, सतर्क सावधान व दस्तक हे जोडशब्द वापरले जातात. त्याचा अर्थ काय? "दस्तक" म्हणजे, दारावरील ठक ठक. या शब्दाचा दुसरा, शिवकालीन प्रचलित अर्थ आहे, परवाना मिळवण्यासाठी दिलेली, "फी वा कर" म्हणजे, एक प्रकारचा जकात कर. तो टाळणे, म्हणजे अपराध. आता दुसरा शब्द "सावधान"  ह्याचा अर्थ सरळ आहे. स+ अवधान= अवधानसह= कोठचीही action वा reaction करावयाची ती आधी पूर्ण  विचारांतीच करावी.  तिसरा शब्द , " सतर्क"  तर्क म्हणजे एखादी घटना कशी घडेल,त्याचा परिणाम काय होऊ शकेल, त्याबद्दल अंदाज करणे. स+ तर्क. तो अंदाज ही positive असावा. त्या episodes च्या सुरूवातीस अँकर, जे बोलतो,...

माझे पथदर्शन.आपल्या हिंदुत्वाच्या rather ज्ञानभांडाराचा परिचय- ग्रंथ.

 २७.१ .२०२४. माझे पथदर्शन. आपल्या हिंदुत्वाच्या rather ज्ञानभंडाराचा परिचय- ग्रंथ.  माझ्या ज्ञानार्थी वाचक मित्रमैत्रिणींनो, आपले रामलल्ला आले. हनुमंताची ( पहचान कौन) कमाल. अयोध्देत, अगदी औचित्य साधून मूर्ती स्थापन केली, ती पंचवर्षिय रघुकुल  तिलकाची. कारण,अयोध्दा ही रामजन्मभूमी आहे. तेथेच त्यांचे तिन्ही बंधुसमवेत, शिक्षण झाले. आज आपल्या लहान थोर मंडळींनी, शिक्षणाचे महत्व  जाणले पाहिजे. तेथेच त्यांचे, बालपण- मोठेपणात बदलले. असो.       आज मी तुमची ज्ञानलालसा जागृत करणार आहे. तुम्ही कोणत्याही वयाचे असा, नवनवीन माहिती करून घ्यावयाची इच्छा असावी. आजच्या या मोबाईलच्या युगात, गुगलवर सर्व माहिती- सर्व भाषेत मिळते, वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ गुगल सांगतो. तो काय चमत्कार आहे का?        अं हं! त्या गुगलकर्त्याने, किती प्रयत्नाने, हे ज्ञान भांडार जमवले असेल, ह्याची जाणिव ठेवा.  सकल जग भरच्या देशांचे ज्ञान तेथे एकवटले आहे हो!       निदान आपण आपल्या हिंदूंच्या सर्व  ग्रंथाची तोंड ओळख तरी करून घेऊ या. तसे तर आपण सर्वांनी, शाल...

प्रजासत्ताक दिन. सर्व शाळांतून साजरा करायचा दिन. आजकाल housing society तून ही साजरा करतात. बहुदा कसे ते(?).

 २६. १ .२०२४. प्रजासत्ताक दिन. सर्व शाळांतून साजरा करावयाचा दिन. आजकाल housing society तून ही साजरा करतात. बहुदा कसे ते(?).     भारतदेशवासी नागरिक वाचकहो, तुम्ही अाता कोठे आहात हो, नाराज होऊ नका, पण तीन दिवस सलग सुट्टी मिळालेय, त्यामुळे, सर्व  रिसॉर्टस्, मॉल मधील मनोरंजनाची  ठिकाणे, हिल्स स्टेशन्स आणि अशीच काही स्थळे दुथडी भरून वाहत आहेत. असो. तरीही त्यातून वेळ काढून, माझा ब्लॉग वाचलात, तर देशाला वाचवाल. पर्यायाने आपले व आपल्या मुलांबाळांचे भविष्य वाचेल. तर आता छ.संभाजी राजेंच्या, " बुधभुषण" या ग्रंथातील, श्लोकाचा पुढील भाग, जाणून घेऊ या.                 उत्साही पर रंध्रविद् कृतधृति:,                वृध्दिक्षयस्थान् विद् ।               शूरो, न व्यसनी, स्मरति उपकृतं,               वृध्दापसेवी च य:।। २ ।।             सर्वांनी सदैव उत्साही असावे. रंध्र विद् = स्व दोष जाणणा...

कालच्या श्लोकाचा अर्थ व सकल छत्रपतींचे आजच्या मराठेशाहीला आव्हान.

 २५. १. २०२४. कालच्या श्लोकाचा अर्थ व सकल छत्रपतींचे आजच्या मराठेशाहीला आव्हान.    सुज्ञ व विचारवंत वाचक हो, मी हे जे लिखाण करत आहे, ते देशाभिमानी लोकांना  क्रियाशील करण्यासाठी व track वरून घसरलेल्या,अजाण मंडळींना मार्ग दाखवण्यासाठीच.         *॥*तुम्ही बहुदा पहिल्या वर्गातच असाल ही अपेक्षा व आशा आहे. तर कालच्या शंभुराजांच्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊ या. हे आव्हान, आपल्या लाडक्या शंभुराजांनी, समस्त छत्रपतींच्या वतीने, अाजच्या व पुढील प्रजेला केले आहे.  छत्रपती शिवाजींना मानत असाल तर योग्य विचारी नागरिक बना.🙏. जमेलच तुम्हाला. इच्छा तेथे मार्ग.               Try try until you succeed.  Then start your path.                                       मेधावी, मतिमान, दीनवदन,                  दक्ष, क्षमावान,  ऋजु: ।             ...

छत्रपतिु संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ- बुधभुषण व त्यांच्याशी झालेली गद्दारी.

 छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या१६ व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ व त्यांच्याशी झालेली गद्दारी.         देशप्रेमी व जागृत वाचक हो,  आज आपला संपूर्ण भारत देश राममय झाला असताना, आपल्या महाराष्ट्रात काय चाललेय बरे?  आज फाल्गुन जवळ आला.  छत्रपती    संभाजी महाराजांची आठवण व अभिमान आणि आपल्या मराठेशाहीचा गर्व अन् त्यांचे बलिदान आठवून, स्वबळावर, पराक्रम ( आजच्या काळातील- शिक्षण व चांगली  नोकरी. मिळवून स्वाभिमानाने जगावयाचे, तर हे भलतेच चाललेय.                मेधावी, मतिमान, दीनवदनो',            दक्ष' क्षमावान,  ऋजु: ।             धर्मात्मा,   अपि अनुसुयको,लघुकर:,              षाङग़ुण्यविद्, शक्तिमान् ।                उत्साही पर रंध्रविद् कृतधृति:,                    वृध्दिक्षयस्थान् विद् ।   ...

छ. संभाजीमहाराज लिखित संस्कृत ग्रंथ, " बुधभूषण" मधील बहुमोल सल्ला.

 २३.१ .२०२४.      छ. संभाजीमहाराज लिखित संस्कृत ग्रंथ, " बुधभूषण" मधील बहुमोल सल्ला.      सुज्ञ वाचक हो, आज आपण सर्व भारतिय आनंदाच्या सागरात आहोत. त्या माननिय रामानंद सागरांना शतशः वंदन, ज्यांनी त्या वेळच्या मुलांना, श्रीरामाची महती सांगितली व त्यायोगे, त्यांना हिंदुत्वाची दिशा दाखवली होती. त्याच बिजांचे आज रामोत्सव द्वारे- वृक्षांत रूपांतर दिसत आहे. अन् सर्व जनता आज हा उत्सव,मनापासून व श्रध्देने  साजरा करू शकत आहे.           जर आपल्याला, जीवनात काहीतरी चांगले करायचे असेल, तर मुख्य आपल्याला - स्वतःला ओळखा. आपली योग्यता व क्षमता जाणून घ्या. मी नेहमी एक श्लोक सांगते.         "राम"चा  अर्थ क्षमता. त्याची खरी दखल घ्या.            बहुदा सर्व गुणार्थी असतात. विद्यार्थी/ ज्ञानार्थी कोणी नसतात. पदवीसाठी विशिष्ट प्रकारे अभ्यास करतात. पण सखोल अध्ययन करणे, होत नाही.      म्हणूनच मी शंभुराजेंच्या या, "बुधभूषण" ग्रंथाची ओळख, अापल्या वाचकांना करून द्यावयाची ठरवली...

श्रीराम जय राम जय जय राम॥ एका गीता जयंतीला सुरू झालेला, हा संग्राम आज प्रत्ययास येत आहे

 २२. १. २०२४ . श्री राम जयराम जय जय राम। एका गीता जयंतीला सुरू झालेला, संग्राम आज प्रत्ययास येत आहे.      हिंदु भक्त हो,आज कित्येक वर्षांपासून ही हाक देत, व राम राज्याची अास मनी बाळगत, अनेक पिढ्या ईश्वर चरणी लीन झाल्या. त्यात माझी आजी( जिला सर्वजण काकी म्हणत) . तिचाच हा वरील जप होता. तिची ही अास होती, तेथे रामराजा वनवासात आहे, तो महाली कधी राहील.                     हे श्रीरामाऽ ऽ ऽ              एक आस मज एक विसावा,               एकवार तरी राम दिसावा ॥       हे व अशीच गीते  आळवली गेली. मग ग.दि.मा.च्या गीत रामायणाने,मराठी मनाचा ठाव  घेतला. पण सर्वांत वरचढ ठरले, माननिय रामानंद सागर. त्यांनी , दूरदर्शनाचा, खरा उपयोग करून, जनमानसात, श्रीरामाला विराजमान केले. जेव्हा रामायण दाखवले जाई, तेव्हा रस्ते सामसूम असत.  मला सांगायला खेद वाटतो. आपल्या निधर्मी संविधानाच्या, काही कलमानुसार, हिंदू धर्माच्या ग्रंथाचे वाचन शिक्षण, ...

हे सुर्यायेवढे सत्य आहे कि, आत्मक्षमता हीच खरी सर्वांची ताकद असते.

 २०.१ .२०२४.  हे सुर्यायेवढे सत्य आहे कि, आत्मक्षमता हीच सर्वांची ताकद असते.      मत्प्रिय सज्ञान, खरे तर सुज्ञात वाचक हो,  माझे हे गंभीर परंतु  आश्वासक लिखाण,  आपण वाचून, समजून घेत आहात. हेच माझे व आपल्या सर्वांचे भाग्यआहे. भाग्य हे नशिबावर अवलंबून  नसते, तर प्रयत्नांच्या खंबीर पायांवर उभे  राहते. हे दोन पाय म्हणजे - प्रयास व चिकाटी. तेव्हा सर्वात AVOID काय करायचे, तर-मला काय माहीत? अं हं, माहित करून घ्या. तसेच लहान मुलांची जिज्ञासा पुरी करा. आपल्या घरातील जेष्ट व्यक्तींची ही जिज्ञासा पूर्ण करा. आजकालच्या बँक व्यवहाराची त्यांना माहीती करून द्या. मग त्यांना- - ATM debit credit card KYC  येणारे Unknown नंबरचे calls  वगैरे. त्या बाबत ते बालकच असतात. मग ते तेथे जाऊन परक्याची मदत घेतात. अन् फसवणूक होते. अहो, त्यांची फसवणूक म्हणजे तुमचीच फसगत. ह्या दोन्ही शब्दात मोठा फरक आहे. फसवणूक समोरचे करतात व फसगत आपल्या नजरचुकीने होते. यासाठी आपण आत्म क्षमतेत कमजोर होऊ नये, दुसरे म्हणजे, " मला येत नाही." अं हं ! "I can do it." हा मंत्र जपा. या...

आपले ध्येय नेमके ठरवा व त्या दिशेने वाटचाल करा, हाच सन्मार्ग होय.

 १९.१ .२०२४ . आपले ध्येय नेमके ठरवा. व त्या दिशेने वाटचाल करा,  हाच सन्मार्ग.      माझ्या वाचकांनो, rather followers, तुम्ही माझ्या ह्या ब्लॉगला, चांगल्यापैकी response देत आहात. मग त्याच बरोबर, माझ्या सुचना व उपदेश ही follow करत असाल, हे गृहीत धरू नं? कारण, त्यात, तुमचे सर्वांचे भले करण्याचा हेतू मनी धरून, " ह्या ब्लॉग" चे लिखाण, मी करीत आहे. हा उपक्रम एकप्रकारे, प्रवचानाचा प्रकार आहे. पूर्वी मंदिरातून असे "किर्तन व प्रवचन" जनहिताय करण्याची प्रथा होती. माझ्या लेखी हे एक मंदिरच आहे.  माझा राम- माझी क्षमता, सामोरी असते. तो माझ्या ज्ञान देण्याचे रूपांतर, तुमच्या रूपाने, ज्ञान घेणार्‍यात करीत अाहे. हे माझे भाग्यच आहे.      काल मी श्रीकृष्णाच्या गीतेचा उल्लेख केला होता. तर बघा. त्यांनी ही, हेच सांगितले आहे.                भगवत गीता.द्वितीय अध्याय. श्लोक ४६.           यावानर्थ उदपाने सर्वतःसंप्लुतोधके।           तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६॥ ...

करूणाष्टके. ५ ते ७. अभ्यासाची सोपी पध्दत. चत्वार वाचा.

 १८.१ .२०२४ . करूणाष्टके ५ ते ७. अभ्यासाची सोपी     पध्दत. चत्वार वाचा.  प्रिय वाचक जन हो, ही करूणा, समर्थांनी सर्व जनांसाठी, त्यांनी आपल्या मनावर ताबा मिळवावा, ह्यासाठी कसे प्रयास करावे, हे अधिकारवाणीने सांगितले आहे. भगवत् गीता ही हेच सांगते. आपण आपले कर्तव्य करीत रहावे. अर्थात् अपेक्षा पूर्ती, प्रत्येकाला हवीच असते. अन् ही मनीषा - मनी मानसी असणे, योग्यच आहे. पण जेव्हा ती लगोलगच व्हावी, नाहीतर, निराश होणे, चूकीचे आहे. श्रध्दा व सबुरी राखावी.  आपले मन सगळ्यात गुंतलेले असते. पण ते अंतर्मुख व्हावे, म्हणून प्रयास करावा, सकलजनांनी. मी नेमके काय करू शकते/तो. हा शोध घ्यावा.आपले प्रयत्न अचूक दिशेने होत आहेत का? याचा   तपास करावा. आपण जिथे कमी पडत आहोेत, तिथे, " आपणच" असावे. म्हणजे, सुधारणा निश्चितच होईल. ह्या अनुषंगानेच, पुढील श्लोक वाचा बरे. कसे तर "चत्वार वाचा" वापरून. म्हणजे बघा. आधी एका श्लोकाच्या चार ही ओळींकडे, एकदम टक लावून बघा. मग  जीभ न हलवता, फक्त डोळ्यांनी वाचा. नंतर नेहमी प्रमाणे, मनातल्या मनात  दोनदा वाचा. मग मोठ्याने ओठ हलवून वाचा...

राम म्हणजे आत्मशक्ती. स्वक्षमता. संस्कृत मध्ये एकाक्षरी शब्द आहेत. "रा" व"म".

 १७.१ .२०२४ राम म्हणजे आत्मशक्ती. स्वःक्षमता.  माझ्या जिज्ञासू व धर्मनिष्ठ वाचक हो.     आज १७ जानेवारी बरोबर ५ दिवसांनी, अयोध्येला, श्रीराम, अनेक शतकानंतर  मंदिरात विराजमान होणार. म्हणून आपण त्यांची, आळवणी करायला हवी नं! दिवसातून फक्त ४.५ मिनिटे.बस. आपल्या ह्रदयात, श्रीरामाची प्रतिष्ठापना करू या. त्यासाठी,या मोबाईलच्या मदतीने, कोठेही असलात तरी, तुम्ही ही भक्ति करू शकाल. ना भल्या मोठ्ठ्या रांगा, ना तासन् तास बसून, जप वा अर्चना.           चला तर मग , हो जायें शूरू।                पुढचा करूणाभरा श्लोक अभ्यासु या.         विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं ।         तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥         रघुकुळटिळका रे हीत माझें करावें ।         दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥                  श्री राम। या शब्दाचा अर्थ समजून घेऊ या.       ...

करूणाष्टके। स्पष्टीकरण ११जाने. १ ते १० चे वाचन. आठवतेय नं!

 १६ जाने. २०२४. करूणाष्टके. स्पष्टीकरण.११ जानेवारीला वाचन.      मत्प्रिय व ज्ञानसिध्द होऊ इच्छिणारे वाचकवृंद हो,       I am proud of you. आजकालच्या jokes& pranks च्या जमान्यात , आपण.मोठ्या संख्येने , माझ्या ह्या blogs ना भेट देत आहात. या ग्रंथांपासून, काही माहिती मिळवू इच्छिता आहात. मी नक्कीच आपली अपेक्षा पूर्ती करीन, हे वचन. आपण रामरक्षेच्या  मध्येच, करूणाष्टके १ ते १० वाचली. तर आज त्याचे स्पष्टीकरण करणार आहे. म्हणजे रामरक्षेच्या शेवटच्या श्लोकांआधी मी, करूणाष्टके, का लिहून, आपल्या पुढे ठेवलीत, ह्याचा खुलासा सहजी होईल. आपण सर्वांनी ,"ती" वाचली असतीलच. पण संदर्भासाठी सतत मागे जायला, हे काही पुस्तक नव्हे. तेव्हा परत एक एक पाहू.       अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।      परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥       अचपळ मन माझें नावरे आवरीता ।                                तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥   ...

आज संक्रात. सर्व बाजूने," तिळगुळ घ्या, गोड बोला", चा भडिमार. पण स्वः सुचना?😉😊

 १५. १ . २०२४ . शिर्षक थोडे धक्का देणारे, हो नं?       माझ्या सुज्ञ व समंजस रसिक वाचक हो, आज संक्रात.     पूर्वी लोक, भेटून, शेजारी- पाजारी जाऊन, इतरांना,  तिळगुळ घ्या व गोड बोला,  सांगत असत. आजकाल तर whatsup च्या कृपेने, सगळ्याच सणावारांसाठी, greeting ची wish करण्याची सोय. तीही कशी तर अगदी रेलचेल होय. आला मेसेज,दाब बोट अन् कर forward. आज प्रथमच, मी माझ्याच शब्दांत, टाईप न करता, इथले greeting तेथे व तिथले greeting तेथे सरकवले. I mean forward केले. पण खरे सांगू, समाधान नाही झाले. वयानुसार, प्रत्यक्ष भेटी शक्य नव्हत्या, परंतु, मोबाईलवरून बोलण्याचा किंवा निदान, स्वतःच्या शब्दात, लिहिण्याचा, आनंद काहीसा अौरच. पटतेय का? आता महत्वाचा अन् कळीचा मुद्दा म्हणजे, आपण इतरांना, मारे ऐटीत, तिळगुळ घ्या अन् गोड बोला, अशी नरम शब्दात, order सोडतो, पण कधी, संक्रांतीलाच नव्हे, तर एरवी, आपणा स्वतःला, ही सुचना केली असते का? मी मलाच "हा" वरवर सोपा, पण गहन प्रश्न विचारला.   उत्तर शोधताना, जरा गोंधळच झाला. yes or no  संमिश्र उत्तर हाती लागले. वाचक हो, ...

रामरक्षेचा उर्वरित श्लोक ३६,३७ व ३८.रामरक्षा हे कवच आहे, याची पडताळणी, होण्यासाठी करूण‍ाष्टके १ ते १० दिलेत.

 13.1.2024. रामरक्षेचे उर्वरित श्लोक ३६,३७ व३८. रामरक्षा हे कवच. पडताळणी. मध्ये करूणाष्टके १  ते १०. सांगितलीय.  सुज्ञ वाचक मंडळी हो, मी मुद्दामच मध्ये करूणाष्टे १ ते १० सांगितली आहेत. त्यानुसार, आपल्या सर्वा़ना,, " रामरक्षेची प्रचिती येऊन, " सत्यतेची व प्रभावाची पडताळणी, करणे, सोपे जाईल.   रामरक्षा ३६ ३७ व ३८ इति समाप्त भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्‌ । तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्‌ ॥३६॥   हा रामनामाचा जप करण्याने जीवनातील,  सर्व कष्ट दूर होतात. ही अंधश्रध्हा नाहीये.  प्रत्यक्षात कित्येकांना ह्या    " राम" शब्दाचा अर्थ माहित नसतो. परवाच आपण याचा अर्थ समजून घेतला. "रा" म्हणजे शक्ती व " म" म्हणजे शिव(असणे)  शक्ती असणे = क्षमता.. जर थ्री इडियट मधील All is well. मनाला भावते. I can do it बोलले कि छान वाटते. मग short मध्ये तोच जप-" राम राम" म्हटले तर, क्षमता असा अर्थ असलेला राम राम बोलणे, अंधश्रध्दा का बरे? अं!    पुढची ओळ नीट वाचा. हा जप करणारा, सर्व सुख व संपत्ती व ऐश्वर्य मिळवू शकतो. बघा, इथे मिळते म्हटले नाही. तसे अ...

करूणाष्टके.प्रारंभ. रामरक्षेच्या अध्ययनासोबत ह्या समर्थरामदासस्वामींच्या कवनाचा परिचय करा.

 ११. १ .२०२४ .करूणाष्टके. प्रारंभ.  रामरक्षेच्या अध्ययना बरोबरच,आता समर्थरामदासांच्या, समर्थ अशा काव्याचा परिचय करू या.   मत्प्रिय धर्मनिष्ठ वाचक वृंद हो,   आजचा विषय, रामराज्यच आहे. मी तुम्हाला, धर्मनिष्ठ म्हणून हाक दिली, ती अशी कि, धर्म म्हणजे हिंदू - मुस्लिम- ख्रिश्चन-पारशी- बौध्द या अर्थी नव्हे, तर धृ इति धारयती- आपले कर्तव्य, मातृकर्तव्य- पितृकर्तव्य, पुत्र कन्या कर्तव्य, गुरू- शिष्य कर्तव्य तसेच राजा प्रजा कर्तव्य या अर्थी लिहिले. जर आपल्या, न्यायनिष्ठ व उत्कृष्ट, राजा शास्ता हवा तर, आपणही प्रजा व नागरिक म्हणून योग्य आचरण करणे, आवश्यक आहे ना?     तर समर्थरामदास स्वामी, आपल्या सर्वांच्या वतीने, त्या परमेश्वराकडे, याचना करीत आहेत. या शब्दातील एक अक्षर बदलले, तर केवढा मोठ्ठा अनर्थ होतो, बघा. ,"च" चा "त" केला, तर "ध" चा "मा" ची गत होते बघा. हे एतिहासिक सत्य सर्वांना माहीत आहेच. तर कोणाही सन्मार्गी व्यक्तिला , यातना होऊ नयेत, हीच याचना, ते करीत आहेत. तेव्हा प्रत्येक, मागणीत, स्वतःला बसवून ही, करूणाष्टके  वाचू या. अनुदिन अनुतापें तापलों रामरा...

रामरक्षा. ३२ ते ३६ रामरक्षा संपूर्ण. पण आपल्या अर्चनेस प्रारंभ.

 १०.१ .२०२४ .रामरक्षा . ३१ ते ३६. रामरक्षा समाप्त.पण आपल्या अर्चनेचा शुभारंभ.  वाचकहो,आज मी रामरक्षा, पूर्ण करीत आहे. पण ती फक्त ह्या ब्लॉगमध्ये. पण कृपया ही आपल्या ह्रदयात, व मोबाईलमध्ये save करून ठेवा, अशी हात जोडून 🙏 विनंती आहे. ते तुमच्या आमच्या हिताचेच आहे.            दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।           पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनंदनम्‌ ॥३१॥      ज्या श्रीरामांच्या डाव्या हाताला लक्ष्मण व उजव्या हाताला जानकी व समोर हनुमान बसले आहेत त्यांना मी नमस्कार करत आहे.         लोकाभिरामं रनरङ्‌गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्‌ ।       कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥३२॥                संपूर्ण विश्वात सुंदर व   रणक्षेत्रात धैर्यवान असलेल्या, राजीवलोचन, रघुवंशातील नायक असलेल्ता करूणाकर अशा श्रीरामांना मी शरण जात आहे.       मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ...

श्रीराम म्हणजे आत्मिक क्षमता. रामरक्षा २६ ते ३०.

 ९.१ .२०२४.   श्रीराम म्हणजे आत्मिक क्षमता. रामरक्षा २६ ते३०. मत्प्रिय आणि धर्मनिष्ट वाचकवृंद हो, तुम्हाला, या रामरक्षेची महती पटली असेलच. या वाचनाने व पाठांतराने, स्मरणशक्तीत वृध्दी होतेच, तसेच, एक प्रकारचा  आत्मविश्वास, निर्माण होतो. कोणी हा प्रयोग करून बघितलाय का? नसेल तर आता करा. चांगल्या कार्याला, फक्त ५मिनिटे द्या. अन् बघा चमत्कार.       रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम्‌ ।      काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌       राजेन्द्रं सत्यसंधं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिम्‌ ।      वन्दे लोकभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥२६॥ श्रीलक्ष्मणांचे अग्रज, सीतापती,  काकुत्स्थ कुळाचे सुपुत्र, करूणाकर, गुण सागर, विप्र ( अध्ययन करणारे) भक्त, परम धर्मनिष्ठ व राजांचे राजा, सत्यनिष्ठ असे दशरथ नंदन  हे शामवर्णी व सुशांत आहेत. सर्व लोकांत, ते लावण्यमूर्ती रघुकुलतिलक असे राघव आहेत. अशा रावणांचे शत्रु ठरलेल्या श्रीरामाला, मी वंदन करीत आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथ...

चला बरे, आपण ही, हे रामरक्षारूपीकवच धारण करू या.

 ८.१ .२०२४ .चला बरे, आपण ही, हे रामरक्षारूपी कवच धारण करू या.   रामरक्षा २१ ते २५   माझ्या प्रमाणेच २२जानेवारीची, चातकाप्रमाणे, वाट बघण्यार्‍या, सच्चा हिंदू बंधु- भगिनीनो, आता आपण रामरक्षारूपी कवचाचे धारण करण्यासाठी,                 पुढील २१ ते  २५, आपलेसे करू या.                                                                          संनद्ध: कवची खड्‌गी चापबाणधरो युवा ।          गच्छन्‌मनोरथोऽस्माकं राम: पातु सलक्ष्मण: ॥२१॥      श्रीराम नेहमीच भक्तवत्सल - म्हणजे भक्तांसाठी तत्पर असतात.  स्वतः कवचधारी  आहेतच. अन्, या रामरक्षेच्या रूपाने, ते  भक्तांसाठी, " कवच" होतात. त्यांच्या हातात, सदैव खड्ग व धनुष्य बाण असतो. आपण जर, सच्चा मनाने, त्यांची भक्ती केली व श्रध्दा ठेवली, तर ते आपल्या बंधु लक्ष्...

रामरक्षा ही आपल्यासाठी कल्पवृक्षच आहे.

 ६.१ .२०२४ .   रामरक्षा ही जणू, कल्पवृक्षाप्रमाणेच आहे.       माझ्या सुज्ञ वाचकहो, ह्या रामरक्षेच्या, पठणामुळे, मुलांची, तरूणांची स्मरणशक्ती वाढते. even म्हातारपणी, ही जी विस्मरणाचा आजार संभवतो, त्यावर ही "रामरक्षा"  हा रामबाण उपाय आहे.  बहुतेक जण,सत्संग - गुरूमावली वगैरे, करतात. पण मन स्थिर नसते. तेव्हा, घरबसल्या, फक्त, हा रामबाण वापरा. बरे. तर आता, पुढील १६ ते २० श्लोकाचे अध्ययन करू या. आरामः कल्पवृक्षाणां रामः श्रीमान् स नः प्रभु, अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान्‌ स न: प्रभु: ॥१६॥ श्रीराम आपले प्रभु परमेश्वर आहेत. ते आपणासाठी जणू कल्पवृक्षासमान आहेत. जे आपल्याला सदैव दिलासा ( आराम)  देतात, आपली सर्व संकटे दूर करतात. अशा विश्वात, सुंदर असलेल्या  राघवावर आपण फक्त पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे. आता भरवसा ठेवणे, नितांत सुंदर अाहे. सुंदर म्हणजे दिसायला छान असा अर्थ नाही. तर सत्यम् शिवम् सुंदरम् हे समजून घेणे जरूरी आहे. शिवम् म्हणजे  असणे सत्यम् म्हणजे जे चिरंतर व शाश्वत आहे. ते सुंदरम् म्हणजे प्रसन्न चित्त करणारे. हर्षवर्धक आहे. तरुण...

आपला आत्माराम जागृत ठेवा अन् रामकवच मिळवा. रामरक्षा ११तेच १५

 ५.१ .२०२४ . आपला आत्माराम जागृत ठेवा.अन् रामकवच मिळवा. रामरक्षा ११ते १५.  सक्षम व आत्मारामाला ओळखण्यार्‍या वाचक हो, पुढील श्लोकांचे अध्ययन करून, स्मरणशक्ति वाढवू या.                      पातालभूतलव्योम चारिणश्छद्‌मचारिण: ।            न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥         जे जीव पाताळ पृथ्वी व आकाशात वेगळ्याच रूपात(सोप्या शब्दात, भुतेखेते) वावरतात आणि मनात कपट राखून आसतात, त्यांच्या नजरा, श्रीरामाच्या नामरूपी कवचधारी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणजेच रामजप करणार्‍यांना असल्या जीवांपासून भय नसते.                रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन्‌ ।            नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥१२॥ तसेच श्रीरामाचा सदैव व सतत जो जप करणारा, तो कधीही पापकर्माला आपलेसे करू शकत नाही. तो नेहमी पापभीरू असतो. येवढेच नाही तर, त्याला नेहमी चांगले भोग व मोक्ष प्राप्ती होत असत. ...

रामरक्षा. आपली रक्षा. आपल्यातील आत्मक्षमतेचे रक्षण . ७ ते १०.

 ४.१ .२०२४ रामरक्षा आपली रक्षा.  आपल्यातील आत्मक्षमतेचे रक्षण. ७ ते १०.         माझ्या आत्माभिमानी वाचक हो, तसे पाहता, आपल्यातील , " क्षमता" आपण ओळखून , तिचा उपयोग व उपभोग, आपणच करावयास हवा. म्हणजेच तिची रक्षा- रक्षण होणार.  पण त्यासाठी शक्ती, ही भक्तिनेच मिळते.          रामरक्षा पठण, आपले कसे कसे रक्षण करत असते, ते कळले असेलच. हां, कोणी म्हणेल असे कधी होते का?  ठिक आहे, अंधविश्वास ठेवूच नका. फक्त दिवसातून ५ मिनिटे काढून, सध्या हा ब्लॉग वाचा. काही तरी प्रसन्नचित्त जाणवेल, तेव्हा दिवसातून एकदा पूर्ण रामरक्षा म्हणा. निदान मुलांच्यात, ह्या वाचनाने, एकाग्रता वाढलेली दिसून येईल.  चला तर मग. Let us try. अर्थासहीत वाचून बघा बरे.         करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।             मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ॥७॥        हे सीतापती, माझ्या हाताची रक्षा कर.जमदग्निपुत्र परशुरामजींना जिंकणार्‍या श्रीरामा, माझ्या ह्रदयाची क्रिया सतत योग्य रित...

रामरक्षा २ ते ६. आपल्यातील, , " आत्मारामाला" समजून, त्याची शक्ती मिळवा.

 3.1.2024.रामरक्षा. श्लोक २ ते ६.   आपल्यातील, " आत्मारामाला" समजून, त्याची शक्ती मिळवा.         भक्ती हीच शक्ति, अशी इच्छा धारण करणार्‍या, माझ्या प्रियतम वाचक हो,  आता रामरक्षाचे पुढील श्लोक आत्मसात करू या. ज्या योगे, आपण ही समर्थ व यशस्वी होऊ या.                                श्री रामरक्षास्त्रोतम्       ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।         जानकीलक्ष्मणॊपेतं जटामुकुटमण्डितम्‌ ॥२॥  हे रामजी कसे आहेत, तर ते नीलकमलाप्रमाणे, मेघश्याम आहेत. राजीवलोचन आहेत. त्यांचा केससंभार हाच जणू मुकुट आहे, असे जे राम आहेत, त्यांचे लक्ष्मण व सीतेसह, असे स्मरण करा कि ते लक्ष्मण व सीतेसह  सामोरे मूर्तीमंत ठाकतील. आता यापुढे तुम्हाला समजून येईल कि, श्रीरामाचे स्मरण कसे स्वत:ला फायदेशीर ठरणार आहे                  सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम्‌ ।         ...

रामाच्या नामाबरोबरच रामाच्या स्वरूपाचा महिमा.

 2.1.2024 . रामाच्या नावाचा महिमा  मत्प्रिय वाचक हो, काल लिहिल्यानुसार आज रामाचे स्वरूप व त्याचा अर्थ जाणून घेऊ या. तसे पाहता, माननिय रामानंद सागरजी की, रामकथा तर सर्वानी पाहिली आहेच. तर आता, रामरक्षाचे, अध्ययन करू या.  ॥ श्रीरामरक्षास्तोत्रम्‌ ॥          श्रीगणेशायनम: । अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिक ऋषि: । श्रीसीतारामचंद्रोदेवता । अनुष्टुप्‌ छन्द: । सीता शक्ति: । श्रीमद्‌हनुमान्‌ कीलकम्‌ । श्रीसीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोग: ॥ अर्थ: —  ॥ अथ ध्यानम्‌ ॥ या रामरक्षेचे निर्माता बुध कौशिक ऋषी आहेत. या रक्षामंत्राचे देवता राम व सीता आहेत. हे काव्य अनुष्टुप छंदात रचिले आहे. यातून श्रीरामांना प्रसन्न केले आहे.यातील शक्ती सिता माता आहे. आणि हनुमानजी किलक आहेत. म्हणजे  एकादी गोष्ट उघडण्याची चावी आहेत.  मारूती मार्फत श्रीरामसीता दोघांना प्रसन्न करता येते. या तिघांचे स्मरण व जप करून जीवनातील खरे सौख्य मिळते. त्यांचे ध्यान करावे.               ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्‌मास...

राजस्व मनाचे- राम.तसेच रा:- शक्ती व म:- शिव- असणे.

 1.1 2024. राजस्व मनाचे- रा म. तसेच रा :- शक्ती। म:- शिव - असणे.  आज २०२४ सालचा पहिला दिवस. २१दिवसांनी अयोध्येचा राम , कलियुगातील वनवास संपवून,  अयोध्यानगरीत, पुनर्स्थापित होणार.    माझ्या धर्मनिष्ट वाचक वृंद हो, आजपासून आपण ही रामाची, आपल्या ह्रदयात, "प्रतिस्थापना" करू या. त्यासाठी प्रथम, त्या रामाला समजून घेऊ या. मी राम ह्या शब्दाचा पुढीलप्रमाणे अर्थ लावला आहे. तो अर्थ ह्या शब्दाच्या दुसर्‍या   अर्थाला- संपत्ती अनुसरून ही आहे.               "राम = राजस्व मनाचे."          हे जरा आगळे वेगळे आहे. पण मला ओळखणारे व समजणारे मूळ वाचक निश्चित अंदाज करतील कि,   there is something special  in my mind. and  eagerly start reading. या वाचकांच्या दृष्टीकोनाची, मी खात्रीशीररित्या पुर्तता करीनच करीन. अन् तुम्ही या २१  दिवसात, परत परत माझ्या या ब्लॉगमध्ये याल अशी खात्री बाळगते.      रामनवमी नंतर बाराव्या दिवशी. तेव्हा दशरथ व कौसल्या पुत्राचे नामकरण, भव्य स्वरूपात साजरे...