आपल्याला पुढील पिढीसाठी आदर्श असावे लागेल. सर्वांर्थाने
२९.९ .२०२३. आपल्याला पुढील पिढीसाठी आदर्श असावे लागेल. सर्वांर्थाने. सामाजिक व सायबरच्या बाबतीत. माझ्या प्रिय आदर्श वाचक हो, आपण तसे तर, आपल्यापरीने आदर्श असतो. पण त्यांच्या दृष्टीने विचार करून, त्यांच्या नजरियात आदर्श होण्याचा प्रयास करावा, हे उत्तम लक्षण. ते आता मी न लिहिता, समर्थरामदास स्वामी जे , श्रीरामाकडे मागणे, मागतात, तेच लिहिणार आहे. हे लिखाण इतके सोपे आहे कि, मला समजून सांगण्याची गरज नाही. कारण आपण सुज्ञ व सुजाण आहात. "उत्तम गुण मज दे रामा" पावन भिक्षा दे रामा। दीनदयाळा दे रामा॥१॥ अभेदभक्ती दे रामा । अश्वारोहण दे रामा॥२॥ तद्रुपता मज दे रामा। आत्मनिवेदन दे रामा॥३॥ सज्जनसंगति दे रामा। अलिप्तपण मज दे रामा॥४॥ ब्रह्मानुभव मज दे रामा। अनन्य सेवा दे रामा॥५॥ कोमल वाचा दे रामा। विमल करणी दे रामा॥६॥ प्रसंगवोळखी दे रामा...