मायाजाल व सांप्रत सावळा गोंधळ.
१. ७. २१ गुरूवार जेष्ठ कृष्ण सप्तमी. माया नगरी. आज पुन्हा ४ दिवसाची gap पडली, प्रिय वाचक हो, क्षमस्व. काय करू, ही मुंबईच नव्हे तर, ही पुरी दुनियाच खरेच, "माया" नगरी झालेय. तुम्हाला माहीत आहे, हा " माया" शब्द अगदी पूर्णतः विरोधी अर्थाने वापरला जातो. बघा आता, १. माया:- ममता- प्रेम. हा positive अर्थ. आईची माया. बहिणीची माया वगैरे. २.आदिमाया:- मूळ देवी. पार्वतीला उद्देशून म्हटले जाते. म्हणजे देवत्व. बरोबर नं. ३. माया:- जमवलेले डबोले. साठवलेले धन. आजकाल कोणी निवडून आले कि, पुढारी/ नेते मंडळी करोडोंनी इतकी "माया" जमवतात हो, कि आपण कल्पनाच करू शकणार नाही. ही माया- लक्ष्मी. पण इथे जरा negative अर्थी वापरला जातो हा शब्द. ४. मायाजाल:- भुलभुलैया या अर्थी ही माया शब्द योजला जातो. बघा, माया बाजार. माया नगरी.वगैरे. ते ढोंगी बाबा अन् बाया असे काही मायाजाल पसरतात कि, सामान्य माणूस त्या जाळ्यात फसतो व लुटला जातो. ५. जादूचे प्रयोग:- रंगभूमीवर असे काही हातच...