स्वातंत्र्याची महती सांगणारे लोकमान्य व त्यांची पुण्यतिथी - नेमके ह्याच महिन्यात देशाला मिळाले स्वातंत्र.
३१ ७ . २१. शनिवार. आषाढ कृ. अष्टमी. चला. जुलै संपला. म्हणजे २०२१ अर्ध्यापेक्षा जास्त सरले. उद्या ऑगस्ट सुरू. दोन मोठ्या घटना घडल्यात, या महिन्यात , हे महत्वाचे आहे. एक १५ ऑगस्ट- आपला स्वातंत्र्यता दिन. पण त्या अाधी, ज्यांनी देशाला स्वातंत्र्याची महती सांगणार्या लोकमान्य टिळकांचा १ ऑगस्ट१९२० रोजी मृत्यु झाला. वयाच्या ६४ व्या वर्षी. त्यांची पुण्य तिथी. त्यांची महती ऐकून नव्हे तर जाणून व ती अमलात आणण्याची कोशीश करू या. निदान त्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवामागील त्यांचा हेतू जाणणे, हा उद्देश बाळगू या. त्यांना त्या धार्मिक सणाला सार्वजनिक स्वरूप देऊन, त्या आड, इंग्रजांच्या विरोधात मोहिम उघडायची होती. व्यक्तिस्वतंत्रतेचे व स्वातंत्र्याचे महत्व भारतिय जनतेला पटवायचे होते. त्या कार्यक्रमातून भजन गायन भाषण. किर्तन प्रवचन यातून ( वरवर धार्मिक मेळ्यातून) हे साध्य होत होते., तेच मी आज या blog writting मधून करण्याचा प्रयास करत आहे. तेव्हा 🙏 जोडून ही विनंती कि, कालचे दोन्ही एपिसोड परत परत बघा. आपण या हेतूचे काय , "" वाटोळे """ केलेय, याचा विचार करा...